सर्दी-खोकला झालाय? हे आहेत 14 रामबाण घरगुती उपाय

By Admin | Updated: March 21, 2017 20:19 IST2017-03-21T20:01:46+5:302017-03-21T20:19:41+5:30

बाजारात मिळणारी कफ सिरप्स घेतल्याने शरीरावर घातक परिणामांची शक्यता तर असते आणि त्याने दिवसभर झोपही येते मग अशावेळी...

Cough-cough? These are the 14 domestic home remedies | सर्दी-खोकला झालाय? हे आहेत 14 रामबाण घरगुती उपाय

सर्दी-खोकला झालाय? हे आहेत 14 रामबाण घरगुती उपाय

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 21 - कधी बदलत्या ऋतुचक्रामुळे तर कधी धूर,धूळ आणि प्रदूषणामुळे सर्दी खोकल्याचा त्रास वारंवार होतो. गेल्या काही दिवसांपासून दिवसा उष्णता आणि रात्री थंडी जाणवत आहे. अशा बदलत्या वातावरणामुळे सर्दी-पडसे, खोकला होणे ही नेहमीचीच समस्या असते.

सर्दी-खोकला हा काही गंभीर आजार नसला तरी यामुळे काही दिवस त्रासाला सामोरे जावे लागते. यावर गोळ्या औषधांचा फारसा परिणाम होत नाही. तर बाजारात मिळणारी कफ सिरप्स घेतल्याने शरीरावर घातक परिणामांची शक्यता तर असते आणि त्याने दिवसभर झोपही येते मग अशावेळी तुमच्या स्वयंपाकघरातील काही घटकच कोणताही दुष्परिणाम न करता तुमचा सर्दी खोकला दूर करु शकले तर ? 

काय आहेत उपाय ते जाणून घेऊयात...

लिंबु अर्धे कापुन त्यावर काळी मिरी पावडर व मीठ शिंपडुन ते खाल्ल्यास खोकल्याची तीव्रता कमी होते.

हरभरे-फुटाणे गरम करून यांचा वास घेतल्यास व खाल्ल्यास सर्दी दूर होण्यास मदत होते.

चमचाभर शुद्ध मधात चिमुटभर पांढरी मिरी पावडर टाकुन दिवसातुन 3 वेळा असे 4-5 दिवस घेतल्यासही खोकला कमी होतो.

 निलगिरीच्या तेलाची वाफ घेतल्यास सर्दीमध्ये लवकर आराम मिळतो.

 नियमितपणे द्राक्षांचे सेवन केल्याने साधा सर्दी-खोकला लगेच बरा होतो.

 तुळस आणि अद्रक टाकलेला चहा पिल्यास अराम मिळतो.

दररोजच्या जेवणात लसणाच्या 2-3 पाकळ्यांचा समावेश केल्यास खोकला होण्याची शक्यता फार कमी असते.

दीड चमचा बडीशेपची वाफ घेऊन त्यानंतर थोडे पाणी प्यावे व त्यानंतर लगेच गरम दुध पिल्यास सर्दीमध्ये लगेच आराम मिळेल.

पाव चमचा मिरी पावडर, पाव चमचा सुंठ पावडर, 1 चमचा मध हे सगळे दोन चमचे पाण्यात मिसळून खोकल्याची उबळ आल्यावर हे मिश्रण खाल्ल्यास लगेच आराम मिळतो.

अद्रकाच्या तुकड्यांचा काढा 20 मिली ते 30 मिली दिवसभरातून 3 वेळेस घेतल्यास सर्दीच्या त्रासापासून आराम मिळतो.

पालकाच्या कोमट रसाने गुळण्या केल्यास कोरड्या खोकल्याचा त्रास कमी होतो.

अर्धा चमचा खसखस पेस्ट, 3-4 चमचे नारळाचे दुध आणि चमचाभर मध हे मिश्रण रोज रात्री झोपताना घेतल्यास कोरडा खोकला कमी होतो.

 पाण्यात भिजवलेले बदाम सोलुन त्याची बारीक पेस्ट करून ती सकाळ-संध्याकाळ लोणी-साखरेत मिसळुन घ्यावी.

 जर तुमचे नाक सर्दीमुळे बंद झाले आहे तर, दालचीनी, काळी मिरी, विलायची आणि जिरे एकत्र करून एका सूती कपड्यात बांधून त्याचा वास घेतल्याने आराम मिळेल. असे केल्याने तुम्हाला शिंक येण्यास मदत होईल आणि तुमचे बंद झालेले नाक मोकळे होईल.

Web Title: Cough-cough? These are the 14 domestic home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.