राज्यात कापूस उद्योगाला घरघर!

By Admin | Updated: December 20, 2014 00:22 IST2014-12-20T00:21:07+5:302014-12-20T00:22:20+5:30

जिनिंग आणि प्रेसिंगचे २२९ युनिट बंद : कापसाला वाढीव भावाची प्रतिक्षा.

Cotton industry in the home! | राज्यात कापूस उद्योगाला घरघर!

राज्यात कापूस उद्योगाला घरघर!

नीलेश शहाकार/बुलडाणा : कापसाला वाढीव भाव मिळेल या आशेने अनेक शेतकर्‍यांनी या हंगामात कापूस विक्रीसाठी आणला नाही. शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याने राज्यातील २२९ जिनिंग आणि प्रेसिंग अद्यापही सुरूच झाल्या नाहीत. व्यापार्‍यांनी कापसाला प्रति क्विंटल ४७00 रुपये खरेदी भाव दिल्याने दररोज हजारो ट्रक कापूस राज्याबाहेर रवाना होत आहे. त्याचा फटका स्थानिक जिनिंग प्रेसिंग उद्योगाला बसला असून, हा उद्योगच अडचणीत सापडला आहे. २0१४-१५ साठी केंद्र सरकारने कापसासाठी प्रति क्विंटल ४0५0 रुपये आधारभूत दर ठरविलेला आहे. जिनिंग प्रेसिंगमध्ये कापसासाठी ३९00 रुपये भाव आहे; मात्र महाराष्ट्रातील कापूसाला इतर राज्यांसह आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला भाव मिळतो. त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना भाववाढीची प्रतिक्षा आहे. याच कारणामुळे शेतकरी आपला कापूस जिनिंग प्रेसिंगमध्ये आणत नसल्याचे चित्र आहे. राज्यभरात खाजगी व सहकारी क्षेत्रातील ८६७ जिनिंग आणि प्रेसिंग युनिटस आहे; मात्र यातील केवळ ६६८ युनिटस सुरु असून, २२९ युनिट बंद असल्याचे महाराष्ट्र राज्य पणन संचालनालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. यावर्षी अनियमित पावसामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. कोरडवाहू शेतीतील कापसाची वेचणी संपली आहे. त्यातच लाल्या रोगामुळेही उत्पन्नावर परिणाम झाला आहे. या कमी उत्पादनाचाही फटका जिनिंग उद्योगाला बसला आहे. . जिनिंग प्रेसिंग उद्योगांची स्थिती चालूबंदएकूण खाजगी५९१३0६२१ सहकारी७११९९२७६ एकूण ६६८२२९८६७

Web Title: Cotton industry in the home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.