पुण्यात कॉटन कंपनीला भीषण आग, ५ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 16:32 IST2016-10-20T12:13:14+5:302016-10-20T16:32:23+5:30
पुण्यातील तळेगाव-चाकण रोडवरील खराबवाडी येथे एका कॉटन कंपनीला लागलेल्या भीषणआगीत ५ जण ठार झाले आहेत.

पुण्यात कॉटन कंपनीला भीषण आग, ५ ठार
>ऑनलाइन लोकमतट
पुणे, दि. २० - पुण्यातील तळेगाव-चाकण रोडवरील खराबवाडी येथे एका कॉटन कंपनीला लागलेल्या आगीत ५ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये ४ महिला व एका पुरूषाचा समावेश आहेत. अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
आज सकाळी लागलेली ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जळालेले मृतदेह हे ग्रामीण रुग्नालय चाकण येथे पाठवीण्यात आले आहेत.
सदरचे गोडावून हे सुमारे २५०० स्के फूट आकाराचे पुर्णतः भिंती व छत हे पत्र्यांनी बनवलेले आहे .गोडावूनमध्ये सुमारे २० ते ३० टन इतका कापूस व कापडी चिंध्या असाव्यात. सदर गोडावूनमध्ये गादया व इतर व इतर वस्तू तयार केल्या जात होत्या.
सदरची आग ही दिड तासांचे प्रयत्नाने विझवण्यात आली. त्यासाठी ४ आग्निशामन वाहने , ४ पाणी टँकर, ३ खूु मशिन व ८ रूग्नवाहीका यांनी तत्परतेने प्रतिसाद दिल्याने गोडावून लगत असणारी ४ मजली इमारतीत असणारे नागरीकांना तातडीने सुरक्षीत रित्या हलवता आले व सदर इमारतीस कोणताही धोका पोहचला नाही.

मृतांची नावे :
1) कल्पना शिरसाठ - वय 29
2) राधा ठाकूर - वय 26
3) उज्वला सोनसळे - वय 32
4) कुसुम साखरकर - वय 30
5) रामदास राठोड - वय ५२