बाधितांवरील उपचाराचा जवानांनी उचलला खर्च; गावातच दहा जणांवर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 05:50 AM2021-04-28T05:50:51+5:302021-04-28T05:55:11+5:30

शेलु बु. येथील उपक्रम : गावातच दहा जणांवर उपचार

The cost of treatment of the victims was borne by the soldiers | बाधितांवरील उपचाराचा जवानांनी उचलला खर्च; गावातच दहा जणांवर उपचार

बाधितांवरील उपचाराचा जवानांनी उचलला खर्च; गावातच दहा जणांवर उपचार

Next

गजानन गंगावणे

देपूळ (जि. वाशिम) : ‘गाव करी ते राव न करी’ याची प्रचिती वाशिम तालुक्यातील शेलू बु. या गावात येत आहे. गावातील सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांवर गावातच उपचार मिळावे, या उद्देशातून येथील लष्करातील जवान एकवटले असून, कोरोना बाधितांवरील उपचाराचा सर्व खर्च त्यांनी उचलला असून औषधेही उपलब्ध केली आहेत.

सध्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होत आहे. हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ही परिस्थिती पाहून गावातील रुग्णांवर पहिल्याच टप्प्यातच योग्य उपचार मिळावे, असा चंग या जवानांनी बांधला. लवकर निदान व उपचारामुळे रुग्ण लवकर बरा होऊ शकतो, हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. त्यामुळे सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी गावातच आरोग्य उपकेंद्रात सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गावातील आठ जवान, इतर अधिकारी, सरपंच यांनी समन्वयातून कोरोना रुग्णांबरोबरच इतर रुग्णांनादेखील गावातच मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी एका खासगी डॉक्टरची सेवा घेण्यात येत आहे. दिमतीला आरोग्य कर्मचारीदेखील आहेत.

लष्करात सैनिक असलेले देवानंद गुट्टे, भागवत दमगीर, पंडित तडसे, अनिल उमाळे, राजू तडसे, विठ्ठल ठाकरे, अजय गावंडे, करण कदम, गजानन ठाकरे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी राहुल उंद्रे, सरपंच तूषणा देवानंद गुट्टे आदींनी पुढाकार घेत कोरोना रुग्णांना आधार देण्याचा प्रयत्न सुुरू ठेवला आहे. सध्या दहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनसह आवश्यक त्या औषधांचा खर्चही या जवानांनी उचलला आहे. गावात औषधांचा साठादेखील उपलब्ध करून दिला आहे.

Web Title: The cost of treatment of the victims was borne by the soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.