पोलीस लाइनच्या डागडुजीवरचा खर्च वाया

By Admin | Updated: December 29, 2014 04:56 IST2014-12-29T04:56:09+5:302014-12-29T04:56:09+5:30

भिवंडी शहरातील जुन्या व नव्या पोलीस लाइनच्या डागडुजीवर दोन वर्षांत सार्वजनिक बांधकाम खात्याने एकूण ३ कोटी ३३ लाख रुपये खर्च केला

The cost of repair of police line wasted | पोलीस लाइनच्या डागडुजीवरचा खर्च वाया

पोलीस लाइनच्या डागडुजीवरचा खर्च वाया

काल्हेर : भिवंडी शहरातील जुन्या व नव्या पोलीस लाइनच्या डागडुजीवर दोन वर्षांत सार्वजनिक बांधकाम खात्याने एकूण ३ कोटी ३३ लाख रुपये खर्च केला आहे. एवढा खर्च करूनही पोलिसांची कुटुंबे नरकयातना भोगत आहेत. त्यामुळे कागदावर दाखवलेल्या एवढ्या खर्चाचे काय झाले, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
शहरातील जुन्या व नव्या पोलीस लाइनमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस कुटुंबे राहत आहेत. पावसाळ्यात स्वखर्चाने ताडपत्री टाकली जाते. तसेच दिवसरात्र उंदरांच्या वावरामुळे घरात व परिसरात उकिरड्यासारखी अवस्था होते. सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत घराला नित्यनेमाने रंगरंगोटी व डागडुजी केली जात नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याने भादवड नवीन पोलीस लाइनमध्ये संरक्षण भिंत, शौचालय दुरुस्ती, गटार दुरुस्ती, दरवाजे-खिडक्या दुरुस्ती, रस्त्याचे डांबरीकरण असे एक कोटी ३१ लाख रुपये खर्च केल्याचे दाखवले आहे.
जुनी पोलीस लाइन येथे प्रसाधनगृह व मलनि:सारण दुरुस्ती, निवासी छत, किचन ओटा, घरातील लाद्या, शेड, घरासमोरील गटार बांधकाम, लादी, दरवाजे-खिडक्या, छपरांची दुरुस्ती व मलनि:सारण लाइनची दुरुस्ती यासाठी एक कोटी ३३ लाख खर्च केल्याचे दाखविण्यात आले.(वार्ताहर)

Web Title: The cost of repair of police line wasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.