शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वापराची वीज महागण्याची शक्यता; वीज ताेडणी स्थगित, शेतकऱ्यांना दिलासा; उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 07:38 IST

वीजबिल न भरल्याने कृषी पंपांचे कनेक्शन कापण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली. ती थांबवावी अशी शेतकरी व लोकप्रतिनिधींची मागणी होती.

मुंबई : थकबाकीच्या आर्थिक संकटावर मात करण्याचा एक उपाय म्हणून घरगुती व औद्योगिक वापराच्या विजेचे दर महावितणकडून पुढील महिन्यात वाढविले जाण्याची शक्यता आहे. थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती डळमळीत झाल्याने हा पर्याय निवडला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांकडील कृषी पंपांचे वीज कनेक्शन कापण्यास उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली. चालू बिल भरल्यास कनेक्शन कायम ठेवले जाणार आहे. या निर्णयाचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. वीजबिल न भरल्याने कृषी पंपांचे कनेक्शन कापण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली. ती थांबवावी अशी शेतकरी व लोकप्रतिनिधींची मागणी होती. राज्याच्या अनेक भागात लाखो शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालेले असताना बिलाची सक्तीने वसुली करणे अन्यायकारक ठरेल, हे लक्षात घेऊन चालू वीजबिल भरल्यास कनेक्शन कायम ठेवण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला आहे. राज्यात कृषी पंपांची ४६ हजार कोटींची थकबाकी आहे. जवळपास ४० लाख वीज कनेक्शन असे आहेत ज्यांच्याकडे थकबाकी आहे. जवळपास ७० हजार कोटींची थकबाकी राज्यातील विविध प्रकारच्या (घरगुती, औद्योगिक, कृषी आदी) वीज ग्राहकांकडे महावितरणची थकबाकी जवळपास ७० हजार कोटी रुपये आहे. त्यामुळे महावितरण कंपनीची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कृषी पंपांचे वीज कनेक्शन कापण्यास सुरुवात झाल्यानंतर स्थगिती दिली गेली पण काही प्रमाणात कनेक्शन तोडणे सुरूच होते. 

चिंता खर्च भागविण्याची -- महाविकास आघाडी सरकारच्या काळात कृषी संजीवनी योजना आणली गेली होती. - वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना त्यावरील थकबाकीवरील व्याज व विलंबित शुल्क माफ करण्याचा निर्णय झाला होता. - महावितरणचा डोलारा सांभाळण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसाहाय्य द्यावे अशी मागणी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केली होती. 

लेखी आदेश दोन दिवसांत -फडणवीस यांच्या आजच्या घोषणेनंतर महावितरण एकदोन दिवसात स्थगितीचा लेखी आदेश काढण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाच दिलासा देण्यात आला आहे की, संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना हे त्यातून स्पष्ट होणार आहे.

कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न -दर्यापूर : सन २०२० मध्ये कृषिपंपाच्या जोडणीसाठी अर्ज केल्यानंतर प्रतीक्षा हाती आलेल्या शिंगणापूर येथील शेतकऱ्याने सोमवारी दर्यापूर येथील महावितरण कार्यालयात पेट्रोल अंगावर घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. उपस्थित नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. अमोल मनोहरराव जाधव, असे या शेतकऱ्याचे नाव आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीelectricityवीज