कॉसमॉस व्हावी पथदर्शी बॅँक
By Admin | Updated: November 25, 2014 23:17 IST2014-11-25T23:17:35+5:302014-11-25T23:17:35+5:30
कॉसमॉस बँक सहकारक्षेत्रत तज्ज्ञ असून, तिने पथदर्शी बँक म्हणून काम करावे, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली़

कॉसमॉस व्हावी पथदर्शी बॅँक
पुणो : सहकार हा एक संस्कार असून, सहकारी संस्थांमध्ये काम करताना पदाधिका:यांनी विश्वस्त या भावनेने काम केल्यास संस्थेबरोबरच देशाच्या प्रगतीला हातभार लावू शकतात़ कॉसमॉस बँक सहकारक्षेत्रत तज्ज्ञ असून, तिने पथदर्शी बँक म्हणून काम करावे, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली़
पुण्यातील गणोशखिंड येथे उभारण्यात आलेल्या कॉसमॉस टॉवर या इमारतीचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाल़े या वेळी ते बोलत होत़े सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे प्रमुख पाहुणो होत़े
फडणवीस म्हणाले, ‘‘कॉसमॉस बँकेने अतिशय सुंदर व देखणो कॉर्पोरेट ऑफिस निर्माण करून पुण्याच्या वैभवात भर घातली आह़े प्रगत अर्थव्यवस्थेमध्ये अर्थपुरवठय़ाला व सेवेला फार महत्त्व असत़े शेतकरी आत्महत्येच्या कारणामागील अभ्यास नियोजन आयोगाने केला तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले, की आत्महत्या केलेल्यांपैकी 55 टक्के शेतक:यांना कजर्पुरवठा उपलब्ध नव्हता़ त्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागले होत़े प्रादेशिक असमतोलामध्ये बँकांच्या शाखाही महत्त्वाच्या असतात़ राज्यातील 6क् टक्के शाखा या 3 जिल्ह्यांत केंद्रित झाल्या आहेत़ आज सर्व क्षेत्रंतच उत्पादकता व उत्पन्न वाढविण्यासाठी काम करणो आवश्यक आह़े तसेच, तळागाळातील लोकांना कजर्पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी बँकांचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे.’’
सहकारावर संकटे आणि सहकारामुळे लोकांवर संकटे आली, असे सांगून फडणवीस म्हणाले, की अर्बन बँकांमध्ये व्याजदर जास्त असल्याने मध्यमवर्गीयांनी आपली जीवनभराची कमाई अशा बँकांमध्ये ठेवली़ बँका अडचणीत आल्यावर त्यांच्यावर मोठा आघात झाला़ सहकारी बँकांनी स्पर्धेत टिकण्यासाठी 21 व्या शतकात कालानुरूप बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितल़े
या वेळी कॉसमॉस टॉवरचे वास्तुविशारद, कंत्रटदार यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ मुकुंद अभ्यंकर यांचेही भाषण या वेळी झाल़े उपाध्यक्ष मिलिंद काळे यांनी आभार मानल़े सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केल़े (प्रतिनिधी)
4कॉसमॉस बँकेने आतार्पयत
15 बँकांचे पुनर्वसन करुन सहकारी बँकांमध्ये गौरवशाली काम केले आह़े पुण्यातील रुपी बँकेचाही प्रश्न आह़े त्यात काही मूलभूत अडचणी असल्याचे मला सांगण्यात आले आह़े केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल़ कॉसमॉस बँकेने 16 वी बँक म्हणून तिचे पुनर्वसन करावी, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केली़
बँकेच्या सात राज्यांमध्ये 137 शाखा असून, 2क् लाख ग्राहक आहेत़ खासगी बँका, सार्वजनिक क्षेत्रतील बँका आपले आलिशान कॉर्पोरेट ऑफिस बांधू शकतात, तर सहकारी बँका का नाही, हा उद्देश ठेवून पुढील 5क् वर्षाची वाटचाल लक्षात घेऊन हे ऑफिस बांधण्यात आले आह़े बँकेला रिझव्र्ह बँकेने करन्सी चेस्टची मान्यता दिली आह़े
- कृष्णकुमार गोयल,
अध्यक्ष, कॉसमॉस बँक