शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

कॉसमॉसच्या संचालक मंडळाची निवडणूक रविवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 21:10 IST

दि कॉसमॉस को-ऑपरेटीव्ह बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक

ठळक मुद्देसात राज्यात मतदान : ५९ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

पुणे : दि कॉसमॉस को-ऑपरेटीव्ह बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या रविवारी (दि. २२) होत आहेत. उत्कर्ष व सहकार पँनेलमधे ही लढत होईल. विद्यमान अध्यक्ष व विद्यमान संचालकांमधे ही लढत होणार असून, या निवडणुकीत राज्याचे माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाराष्ट्रासह सात राज्यातील तब्बल ५९ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. उत्कर्ष पॅनेलमधे बँकेचे विद्यमान अध्यक्ष सीए मिलिंद काळे आणि माजी अध्यक्ष तथा बँकींग तज्ज्ञ डॉ. मुकुंद अभ्यंकर यांच्यासह चार सीए आणि एकूण १३ सदस्य रिंगणात आहेत. त्यांचे मतदान चिन्ह रोडरोलर आहे. तर, सहकार पॅनेलमधे बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्यासह सहा विद्यमान संचावलक निवडणूक रिंगणात आहेत. तसेच, राज्याचे माजी सहकार आयुक्त दळवी आणि इतर पाच व्यक्ती या पॅनलमधे आहेत. सहकार पॅनेलचे निवडणूक चिन्ह टेलिफोन आहे. बँकेच्या पुण्यासह गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यात शाखा आहेत. बँकेचे एकूण ८० हजार सभासद असून, त्यातील ५९ हजार जणांना मतदानाचा अधिकार आहे. त्यातील ३६ हजार सभासद पुणे आणि ८ हजार उर्वरीत राज्यात आहेत. तर, परराज्यातील सभासद मतदारांची संख्या १५ हजार आहे. ---मतदान केंद्रअप्पा बळवंत चौकातील नू. म. वि प्राथमिक शाळा आणि नू. म. वि. प्रशाला, आळंदी येथील जुन्य बस स्टँट समोरील बँकेची शाखा, चिंचवडमधील जयश्री सिनेमागृहा जवळील श्री अग्रेसन भवन येथे २२ डिसेंबरला सकाळी ९ ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होईल. उर्वरीत ठिकाणी बँकेच्या शाखांमधे मतदानाची सोय करण्यात आली आहे. --उत्कर्ष पॅनेल -निवडणूक चिन्ह : रोडरोलर, उमेदवार : डॉ. मुकुंद अभ्यंकर, मिलिंद काळे, अ‍ॅड. प्रल्हाद कोकरे, यशवंत कासार, सचिन आपटे, अजित गिजरे, मिलिंद पोकळे, राजेश्वरी धोत्रे, जयंत बर्वे, प्रवीणकुमार गांधी, नंदकुमार काकिर्डे, अरविंद तावरे, अ‍ॅड. अनुराधा गडाळे.सहकार पॅनेल-निवडणूक चिन्ह : टेलिफोन, उमेदवार : कृष्णकुमार गोयल, गोविंद क्षीरसागर, स्मिता जोग, दिपेंद्र शहा, श्रीपाद पंचपोर, जयंत शाळीग्राम, राजीव साबडे, चंद्रकांत दळवी, अमरनाथ चक्रदेव, मुकेश शहा, योगेश भोकरे, बाळकृष्ण भोसले, सतीश दराडे. 

टॅग्स :PuneपुणेbankबँकElectionनिवडणूक