कॉसमॉस बॅँकेचा वर्धापनदिन उत्साहात
By Admin | Updated: January 20, 2015 23:42 IST2015-01-20T23:42:10+5:302015-01-20T23:42:10+5:30
कॉसमॉस को-आॅपरेटिव्ह या मल्टिस्टेट शेड्यूल्ड बॅँकेचा १०९वा वर्धापन दिन रविवारी उत्साहात साजरा झाला.

कॉसमॉस बॅँकेचा वर्धापनदिन उत्साहात
पुणे : कॉसमॉस को-आॅपरेटिव्ह या मल्टिस्टेट शेड्यूल्ड बॅँकेचा १०९वा वर्धापन दिन रविवारी उत्साहात साजरा झाला.
लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा, संपादक विजय बाविस्कर, महाव्यवस्थापक मिलन दर्डा, सहाय्यक महाव्यवस्थापक आलोक श्रीवास्तव यांनी विद्यापीठ रस्त्यावरील कॉसमॉस टॉवर या नुतन वास्तुला भेट देऊन बॅँकेला शुभेच्छा दिल्या. बॅँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी स्वागत केले.
सायंकाळी रंगलेल्या वर्धापनदिन सोहळ्यात बॅँकिंग, राजकीय, सहकार, उद्योग, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच बॅँकेचे सभासद, खातेदार, ग्राहक यांनी बॅँकेला शुभेच्छा दिल्या. यावेळी उपाध्यक्ष मधुकर अत्रे, व्यवस्थापकीय संचालक विक्रांत पोंक्षे आणि संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते.
कॉसमॉस बॅँक ही देशातील भक्कम आर्थिक पाया असणारी सहकारी बॅँक आहे. आज अखेरचा एकूण व्यवसाय २५ हजार ९६० कोटींपेक्षा अधिक आहे. बॅँकेच्या सात राज्यांत १४० शाखा कार्यरत आहेत.