‘भ्रष्टाचाराचे खटले जलदगतीने चालवावेत!’
By Admin | Updated: January 7, 2016 02:40 IST2016-01-07T02:40:23+5:302016-01-07T02:40:23+5:30
भ्रष्ट अधिकाऱ्यांवरील खटले जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे. कठोर शिक्षेची तरतूद करावी,

‘भ्रष्टाचाराचे खटले जलदगतीने चालवावेत!’
नाशिक : भ्रष्ट अधिकाऱ्यांवरील खटले जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे. कठोर शिक्षेची तरतूद करावी, अशीही मागणी संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दी. कुलथे यांनी येथे केली.
‘पगारात भागवा’ अभियान महासंघातर्फे राज्यात राबविण्यात येत आहे. त्यासाठी कुलथे नाशिक दौऱ्यावर आले होते. भ्रष्ट अधिकाऱ्यांना महासंघ किंवा संलग्न संघटनांमध्ये पदाधिकारी अथवा कार्यकारिणी सदस्य म्हणून स्वीकारले जाणार नाही. भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास, निर्दोष ठरविण्यासाठी निवेदने शासनाकडे पाठवली जाणार नाहीत. अनेकांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. २०१४ मध्ये राज्यात १,२४५ व २०१५ मध्ये १,२३४ अधिकारी- कर्मचारी एसीबीच्या सापळ््यात अडकल्याचे त्यांनी सांगितले.