नगरसेवकांनी झुगारला पक्षादेश

By Admin | Updated: March 2, 2015 02:10 IST2015-03-02T02:10:51+5:302015-03-02T02:10:51+5:30

परिवहन समितीच्या शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत अधिकृत उमेदवाराला मतदान करण्याचा पक्षादेश काँग्रेसच्या १५ पैकी ११ नगरसेवकांनी धुडकावल्याचा

Corporators uprooted the party | नगरसेवकांनी झुगारला पक्षादेश

नगरसेवकांनी झुगारला पक्षादेश

कल्याण : परिवहन समितीच्या शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत अधिकृत उमेदवाराला मतदान करण्याचा पक्षादेश काँग्रेसच्या १५ पैकी ११ नगरसेवकांनी धुडकावल्याचा आरोप पक्षाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सचिन पोटे यांनी केला आहे. यासंदर्भातला अहवाल सोमवारी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना सादर केला जाणार आहे. विशेष म्हणजे पक्षाचा व्हिप बजावण्याची जबाबदारी असलेले गटनेते सदाशिव शेलार यांचाही पक्षादेश धुडकावणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
परिवहनच्या सदस्य निवडणुकीत ६ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसच्या वतीने मनीष देसले हे अधिकृत उमेदवार होते, परंतु शैलेंद्र भोईर यांनी उमेदवारी कायम ठेवत बंडखोरी केली. निवडणुकीत भोईर यांना सहाव्या क्रमांकाची (७६) मते मिळाली तर देसले यांना केवळ २४ मते मिळाल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
अधिकृत उमेदवाराचा पराभव पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतला आहे. यासंदर्भातला अहवाल प्रदेशाध्यक्षांना पाठविला जाणार आहे. केडीएमसीत काँग्रेसचे १५ नगरसेवक आहेत. गटनेते शेलार यांच्यासह उदय रसाळ, शर्मिला पंडित, वंदना गीध, साबीर कुरेशी, भरत पाटील, जितेंद्र भोईर, हृदयनाथ भोईर, नंदू म्हात्रे आणि शिल्पा शेलार या नगरसेवकांनी बंडखोर उमेदवार भोईर यांना मतदान के ले, तर नगरसेवक रवि पाटील यांनी त्यांचे बंधू राष्ट्रवादीचे उमेदवार नितीन पाटील यांना मतदान केल्याचा ठपका जिल्हाध्यक्ष पोटे यांनी अहवालात ठेवला आहे.

Web Title: Corporators uprooted the party