नगरसेवकांची टँकर मॅनेजरला मारहाण
By Admin | Updated: May 22, 2014 02:10 IST2014-05-22T02:10:33+5:302014-05-22T02:10:33+5:30
वारंवार पाण्याच्या टँकरची मागणी करूनही न मिळल्यामुळे त्रस्त

नगरसेवकांची टँकर मॅनेजरला मारहाण
नागपूर : वारंवार पाण्याच्या टँकरची मागणी करूनही न मिळल्यामुळे त्रस्त झालेले नारा प्रभागातील काँग्रेसचे नगरसेवक महेंद्र बोरकर यांनी पाणीपुरवठा कंपनी ओसीडब्ल्यूच्या मॅनेजरला मारहाण केली. एवढेच नव्हे तर ओसीडब्ल्यूच्या अन्य कर्मचार्यांशीही हुज्जत घातली. संबंधित प्रकरणी ओसीडब्ल्यूने जरीपटका पोलीस टाण्यात बोरकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. बोरकर यांनी त्यांच्या प्रभागातील नेटवर्क व नॉन नेटवर्क भागासाठी तीन महिन्यांपूर्वी दोन टँकरची मागणी केली होती. संबंधित टँकर नारा जलकुंभावरील हाइड्रनवर भरण्याची त्यांची मागणी होती. यानंतरही उन्हाळ्यात टँकर उपलब्ध करून देण्यात आले नाही. बोरकर यांनी सायंकाळी ५ च्या सुमारास ओसीडब्ल्यूच्या अधिकार्यांना जलकुंभावर बोलावले. या वेळी अधिकारी व बोरकर यांच्यात वाद झाला. यावेळी बोरकर भडकले व त्यांनी मॅनेजर अरविंद डेकाटे यांना मारहाण केली. डेकाटे यांच्यावर पाण्याची बॉटल फेकली. सोबतच आशीनगर झोनचे व्यवस्थापक अजय यादव, भूषण टाकलकर, अनित सिंह, टी. शर्मा यांच्याशीही वाद घातला. (प्रतिनिधी)