नगरसेवक विनोद शेलार यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा
By Admin | Updated: November 17, 2014 04:23 IST2014-11-17T04:23:29+5:302014-11-17T04:23:29+5:30
भाजपाचे वॉर्ड १५चे नगरसेवक विनोद शेलार यांच्याविरोधात एका महिलेने दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नगरसेवक विनोद शेलार यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा
मुंबई : भाजपाचे वॉर्ड १५चे नगरसेवक विनोद शेलार यांच्याविरोधात एका महिलेने दिंडोशी पोलीस ठाण्यात
तक्रार दाखल केली आहे. जुलै महिन्यात शेलारांविरोधात तक्रारदार महिलेने दिंडोशी पोलीस ठाण्यात याबाबत अर्ज दिला होता. त्यानंतर ४ दिवसांपूर्वी या अर्जाचा तपास करून १३ नोव्हेंबरला नगरसेवक विनोद शेलार आणि त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंग, शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विनोद शेलार व इतर दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणाला अटक केली नसून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिंडोशीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत सुर्वे यांनी दिली.
शेलार नगरसेवक असलेल्या विभागातील एका जागेवर कोणतीही परवानगी न घेता ड्रेनेजचे काम शेलार व त्यांच्या दोन साथीदारांनी केले. ही जागा तक्रारदार महिलेची असून, ती विकासक आहे. याबाबत महिलेने शेलारांना जाब विचारला असता, विनोद शेलार व त्यांच्या दोन साथीदारांनी शिवीगाळ, विनयभंग करीत ठार मारण्याची धमकी दिली होती. विनोद शेलार हे भाजपा मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांचे मोठे भाऊ आहेत. (प्रतिनिधी)