नगरसेविका पाटील यांचे सदस्यत्व रद्द

By Admin | Updated: September 10, 2016 02:18 IST2016-09-10T02:18:10+5:302016-09-10T02:18:10+5:30

नगरसेविका हेमा कैलास पाटील यांनी मौजे बोरी पाखाडी सर्वे नं. ११५ मध्ये अनधिकृत घर बांधले होते.

Corporator Patil's membership canceled | नगरसेविका पाटील यांचे सदस्यत्व रद्द

नगरसेविका पाटील यांचे सदस्यत्व रद्द


उरण : नगरसेविका हेमा कैलास पाटील यांनी मौजे बोरी पाखाडी सर्वे नं. ११५ मध्ये अनधिकृत घर बांधले होते. मात्र हे घर तोडण्यात यावे याबाबत नगरपरिषदेच्या मुख्यधिकाऱ्यांनी हेमा पाटील यांना नोटिसही पाठवली होती. मात्र त्याकडे संबंधित नगरसेविकेने दुर्लक्ष केल्याने जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयाने ३ सप्टेंबर रोजी दिलेल्या निकालात शिवसेना नरसेविका हेमा पाटील यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. बोरी पाखाडी सर्वे नं. ११५ मध्ये करण्यात आलेले बांधकाम बंद करावे, असे आदेश नगरपरिषदेकडून देण्यात आले होते. (वार्ताहर)

Web Title: Corporator Patil's membership canceled