शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अनधिकृत बांधकामांना महापालिका अधिकारी जबाबदार असल्याचा नगरसेवकांचा महासभेत हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 20:12 IST

काशीमीरा येथील आरक्षणातील बेकायदेशीर चाळींवर तोडक कारवाई वरून महापालिकेसह नगरसेवकांवर आरोपांची झोड उठली.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - काशीमीरा येथील आरक्षणातील बेकायदेशीर चाळींवर तोडक कारवाई वरून महापालिकेसह नगरसेवकांवर आरोपांची झोड उठली. नगरसेवकांनी महासभेत अनधिकृत बांधकामांना पालिका अधिकारी जबाबदार आहेत असा संताप व्यक्त केला. महापौरांनी एकीकडे नियमांचे उल्लंघन करून बिल्डरच्या फायद्यासाठी कारवाई केल्याचा घणाघात केला असताना स्थायी समिती सभापती यांनी मात्र पालिका कारवाईचे समर्थन केले. 

माशाचापाडा मार्गावरील उद्यान व रस्त्याच्या अरक्षणातील सुमारे ३०० खोल्या आदी बांधकामांवर शुक्रवारी महापालिकेने पोलीस बंदोबस्तात कारवाई केली होती. पावसाळा व कोरोना संसर्ग तसेच कोणतीच सूचना न देता पालिकेने केलेल्या कारवाई वरून टीका झाली. बिल्डरला टीडीआर देण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप झाला.  बांधकाम होत असताना कारवाई केली गेली नाही. उलट कर आकारणी, पाणी, वीज आदी सुविधा दिल्या गेल्या व त्याला नगरसेवक, अधिकारी जबाबदार असल्याचे आरोप सुरू झाले. 

त्या अनुषंगाने नगरसेवक सचिन म्हात्रे यांनी सदर विषयी गुरुवारच्या महासभेत लक्षवेधी सूचना मांडली.  स्थायी समिती सभापती दिनेश जैन यांनी,  आरक्षित जागेवर महापालिकेचे नाव आहे तर कारवाई बरोबर आहे.  झोपडे होऊ नये असे सांगत कारवाईचे समर्थन केले.  तर महापौर ज्योत्स्ना हसनाळे मात्र आक्रमक होऊन त्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. प्रभाग अधिकारी वार्डात करतो काय ? कारवाईचा अहवाल मागवला तो दिला नाही, इतकी मस्ती झाली आहे. बांधकामांच्या तक्रारी देऊन सुद्धा कारवाई होत नाही . 

कारवाई करताना शासन नियम चे पालन केले नाही. पावसाळ्यात राहत्या घरांवर कारवाई करता येत नाही. कारवाई वेळी कोविड नियमांचे पालन केले नाही. उच्च न्यायालयाने कोविड काळात ३१  ऑगस्ट पर्यंत कारवाई करू नका असे आदेश दिले होते. शासनाने जुन्या घरांना  संरक्षण दिले आहे. काही प्रकरणात न्यायालयाने स्थगिती दिली होती. इतके सर्व असून सुद्धा प्रशासनाने कारवाई केली.  त्यामुळे पालिकेने केलेली कारवाई चुकीची आहे असे महापौरांनी ठणकावले. 

नगरसेवक - नागरिकांना विश्वासात घेतले नाही.  आरक्षणाची जागा मोकळी नव्हती मग बिल्डरला जागा मोकळी करून देण्यासाठी काय घेतले ? असा थेट सवाल महापौरांनी केला. कारवाई झाली तेथे आता झोपड्या परत झाल्या. विक्रमकुमार असताना सर्व परिसरातील बेकायदा बांधकामे तोडून परिसर साफ - सुंदर केले होते. पुन्हा बांधकामे होत असताना अधिकारी का थांबले ?  कोणी येईल व सेटलमेंट होईल, पैसे मिळतील असे वातावरण आहे का ? असेल तर थांबवा ?  बेकायदा बांधकामां बाबत अख्या शहराचा दोष मी एकटी महापौर घेणार का ? अन्यथा कारवाईसाठी द्या मला पावर ? असे आव्हान सुद्धा महापौरांनी दिले. बेकायदा बांधकामे खपवून घेणार नाही. अन्यथा  बदल्या करून घ्या नाहीतर राजीनामा द्या असे खडे बोल महापौरांनी अधिकाऱ्यांना सुनावले. 

यावेळी महापौरांसह आमदार गीता जैन, नगरसेवक अनिल भोसले, रिटा शाह, दौलत गजरे, नीलम ढवण, हेतल परमार, जुबेर इनामदार आदी अनेक नगरसेवकांनी महापालिका अधिकाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. अनधिकृत बांधकाम ना हे अधिकारी जबाबदार असून चौरस फुटा नुसार पैसे घेतात. बिल्डरला टीडीआर मिळवून देण्यासाठी हा प्रकार केला आहे. अनधिकृत बांधकाम सुरू होते तेव्हा प्रभाग अधिकारी ला माहिती देऊन कारवाई करत नाही. यात बिचारी गोरगरीब कुटुंब उध्वस्त होतात असे नगरसेवकांनी बोलून दाखवले.  

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक