महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होऊ लागली आहे. राज्यात आज (शनिवार, ०५ जुलै २०२५) १२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, गेल्या २४ तासात एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली.
या वर्षी १ जानेवारीपासून राज्यात एकूण २,५६९ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यातील ४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शनिवारी १२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, कोल्हापुरातील एका ७६ वर्षीय वृद्ध महिलेची उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. ही महिला आधीच काही गंभीर आजाराने ग्रस्त होती. ज्यामुळे तिची प्रकृती खालावली, अशी माहिती एका वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली.
मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या १ हजार ७ वर पोहोचली आहे. जूनमध्ये ५५१ रुग्णांची नोंद झाली झाली. तर जुलैमध्ये आतापर्यंत १५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. वर्षाच्या सुरुवातीपासून राज्यात २,४६६ रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, १ जानेवारीपासून महाराष्ट्रात ३२ हजार ८४२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.