शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: 'गडबडून जाऊ नका, संघर्ष आपल्या रक्तात'; उदयनराजेंनी केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 14:51 IST

आपण सर्वांनी भारत सरकार ने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर स्वयंशिस्तीत पालन केल्यास या रोगाला मात देऊ शकतो.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे.  राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 101 वर पोहचली आहे. तसेच कोरोनामुळं ६५ वर्षीय रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. या मृत्युमुळे राज्यातील कोरोना बळींचा आकडा आता चारवर गेला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भाजपाचे नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील लोकांनी घाबरुन जाऊ नका असं आवाहन केले आहे.

उदयनराजे ट्विट करत म्हणाले की, सातारा, सांगली येथे कोरोना रुग्ण सापडले असले तरी लोकांनी घाबरून, गडबडून जाऊ नये. लक्षात ठेवा संघर्ष आपल्या सर्वांच्या रक्तात आहे असं उदयानराजेंनी सांगितले. तसेच आपले प्रशासन या रोगाचा निपटारा करण्यासाठी मोठ्या हिमतीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे त्यांना आपल्या सर्वांच्या सहकार्याची नितांत गरज आहे असं आवाहन उदयनराजेंनी केले आहे.

आपण सर्वांनी भारत सरकार ने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर स्वयंशिस्तीत पालन केल्यास या रोगाला मात देऊ शकतो. काहीही झाले तरी आपण आपल्या घराच्या बाहेर पडू नका असं उदयनराजे यांनी सांगितले. तसेच घरातील सदस्याला ताप, डोके दुखी, सर्दी, खोकला, घसा दुखणे इत्यादी त्रास होत असेल तर आपल्या नजीकच्या डॉक्टर शी संपर्क साधा अशी विनंती देखील उदयनराजे भोसले यांनी ट्विटद्वारे केले आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्तांची 101वर पोहचली आहे. आज पुण्यात तीन आणि साताऱ्यात 1 रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 97 वरुन 101 वर पोहचली आहे. तसेच कोरोनामुळं ६५ वर्षीय रुग्णाचा आज मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. या मृत्युमुळे राज्यातील कोरोना बळींचा आकडा आता चारवर गेला आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार