शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: उत्तर प्रदेशातील मजुरांची वाट बिकटच! आधी कोरोना टेस्ट करा मगच पाठवा, योगींची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 06:56 IST

सर्वांची कोरोना तपासणी अशक्य

मुंबई : उत्तर प्रदेशातील लाखो मजूर लॉकडाउनमुळे महाराष्ट्रात अडकले असून त्यांच्या आरोग्य तपासणीची अट योगी आदित्यनाथ सरकारने घातल्याने या मजुरांच्या स्थलांतराचा प्रश्न बिकट बनला आहे.

सुरुवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या लोकांना घेण्याची तयारी दर्शवली होती; मात्र देशभरातून उत्तर प्रदेशात येणाऱ्यांची संख्या किमान एक कोटीच्या घरात आहे. एवढ्या लोकांच्या क्वारंटाइन आणि आयसोलेशनची यंत्रणा उत्तर प्रदेश सरकारकडे आज उपलब्ध नाही. त्यामुळे आता उत्तर प्रदेश सरकारने या लोकांना आपल्या राज्यात घेण्यासाठी वेगवेगळी कारणे पुढे करणे सुरू केले आहे.

उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंंगवर मीटिंंग झाली. त्यात आमच्याकडे पाठवणाऱ्यांची कोरोना टेस्ट करा, निगेटिव्ह रिपोर्ट असतील तरच त्यांना पाठवा. यादीसोबत त्यांचे रिपोर्टही जोडा, अशा अटी उत्तर प्रदेश सरकारने घातल्या. गेले ४० दिवस हे मजूर राज्यात सरकारने तयार केलेल्या निवास व्यवस्थेत आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली असती तर त्या वेळीच ते लक्षात आले असते. त्यांची तपासणी करून त्यांना पाठविणे अशक्य आहे, अशी महाराष्ट्राची भूमिका एका अधिकाऱ्याने स्पष्ट केली.

राज्यात किमान २५ लाख लोक आहेत. एवढ्यांची कोरोना तपासणी करणे अशक्य आहे, असे मत मंत्री  नवाब मलिक यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मुंबईत ४० दिवसांत ७० ते ८० हजार तपासण्या होऊ शकल्या. पंचवीस लाख लोकांच्या तपासण्या महाराष्ट्रात करायचे झाले तर त्यासाठी जो वेळ लागेल, तेवढा वेळ थांबण्यासाठी हे लोक तयार नाहीत, असेही मलिक यांनी स्पष्ट केले. मुंबईत १५ ते २० हजार टॅक्सीचालक आहेत जे स्वत:ची टॅक्सी घेऊन उत्तर प्रदेशला जाण्यासाठी तयार आहेत. अशा लोकांना घेण्यासही उत्तर प्रदेश सरकारने तूर्त सहमती दर्शवली नाही, असे मंत्रालयातील अधिकाºयांनी स्पष्ट केले.कर्नाटक सरकारनेदेखील हीच भूमिका घेतली आहे. कर्नाटकमधील काही लोक महाराष्ट्रात अडकले आहेत. त्यांचीदेखील तपासणी केल्याशिवाय त्यांना पाठवू नका, असे त्यांनी सांगितले.‘आत्ताच लोकांना पाठवू नका’ : आंध्र प्रदेशमधून एक ट्रेन उत्तर प्रदेशमध्ये पोहोचल्यानंतर त्या लोकांना क्वारंटाइन करण्यासाठी ज्या ठिकाणी नेण्यात आले तेथे मोठा गोंधळ उडाला. परिणामी, तिथली सगळी व्यवस्था कोलमडून गेली. म्हणून महाराष्ट्रातून आत्ताच लोकांना पाठवू नका, असे पत्र उत्तर प्रदेश सरकारने महाराष्ट्राला पाठविले. त्यामुळे महाराष्ट्रातून जाणाºया रेल्वेवर आता मोठे प्रश्नचिन्ह तयार झाले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस