शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Coronavirus: महिलांची सामूहिक शक्ती; कोरोना काळात बचत गटांची सव्वाशे कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 07:36 IST

पाच महिन्यांत मास्क विक्रीतून तब्बल ११ कोटी, २६ लाखांची कमाई

समीर देशपांडे

कोल्हापूर : कोरोना काळात बचत गटाच्या महिलांनी पाच महिन्यांमध्ये तब्बल १२५ हून अधिक कोटींची उलाढाल केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून सध्या महिला बचत गटांचे काम जोरात सुरू आहे.

राज्याच्या ३४ जिल्ह्यांतील चार लाख सात हजार महिला बचत गटांशी जोडल्या गेलेल्या आहेत. मास्कची गरज ओळखून त्यांनी ते बनवायला घेतले. ८,४४४ बचत गटांतील ३३,५०० महिलांनी ९३.३५ लाख कापडी मास्क विकून ११ कोटी २६ लाख रुपयांची उलाढाल केली. तसेच २८ हजार ६७७ टन भाजीपाला, फळे, धान्याची विक्री करून त्यांनी २६ कोटी दोन लाख रुपयांची उलाढाल केली. पावसाळ््याच्या तोंडावर खते, बी-बियाण्यांची सामूहिक खरेदी करून ५६ कोटी १८ लाख रुपयांची उलाढाल केली, ज्याचा लाभ तीन लाख नऊ हजार कुटुंबांना झाला.

राज्यातील १४ लाख महिलांनी खरीप हंगाम आॅनलाईन प्रशिक्षणाचा लाभ घेतला. ‘माझी परसबाग’ संकल्पना मांडण्यात आली. यामध्ये ९३ हजार ११२ महिलांनी परसबागा बनवल्या. एक लाख २४ हजार अस्मिता सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा करून २९ कोटी ४९ लाख रुपयांची उलाढाल केली. ‘बँक सखी’च्या माध्यमातून दोन लाख खातेधारकांना ६५ कोटी रुपये उपलब्ध करून दिले.राज्यातील महिला भगिनींनी मनात आणले त्या काय करू शकतात, त्याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. कोरोनाच्या संकटकाळातही हातावर हात ठेवून न बसता या भगिनींनी केलेल्या या कामाला माझा सलाम. - हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्रीआता ‘उमेद’च्या माध्यमातून महिला बचत गटांच्या माध्यमातून गुणात्मक काम करण्याचे सामूहिक प्रयत्न सुरू आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रातील महिलांसाठी काही आणखी उत्पादन प्रकल्प राबवण्याचा आमचा विचार आहे. - आर. विमला मुख्य कार्यकारी अधिकारी,ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महाराष्ट्र

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसWomenमहिला