शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: मास्कच्या किमती नियंत्रणात आणणार; जादा दराने विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 06:48 IST

मंत्रिमंडळाचा निर्णय : जादा दराने मास्कविक्री करणाऱ्या कंपन्यांवर टाच

मुंबई : सर्वसामान्य जनतेला आणि सरकारला वाट्टेल त्या दराने मास्क विकणाºया कंपन्यांवर अखेर सरकारने टाच आणली आहे. मास्कच्या किमती नियंत्रणात आणण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

मास्कच्या किमतीतील घोटाळा ‘लोकमत'ने उघडकीस आणला होता. त्यानंतर सरकारने सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समितीने व्हीनस आणि मॅग्नम या मास्क बनवणाºया कंपन्यांनी गेल्या काही महिन्यात केलेली शेकडो कोटींची लूट आकडेवारीसह समोर आणली. मंत्रिमंडळ बैठकीत यावर विस्ताराने चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील या सगळ्यांनी मास्कच्या किमतीवर नियंत्रण आणले पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली.

मास्क लावला नाही म्हणून आपले अधिकारी जनतेला दंड ठोकत आहेत आणि दुसरीकडे मास्कच्या किमती भरमसाठ वाढवणाऱ्यांना सरकारच पाठीशी घालते हे योग्य होणार नाही. अशी भूमिका सर्वच मंत्र्यांनी मांडली. काहींच्या मते हा निर्णय फक्त सरकार जे मास्क खरेदी करणार आहे, त्या पुरताच मर्यादित ठेवावा, अशी सूचना केली. त्यावर देखील सर्व मंत्र्यांनी तीव्र आक्षेप घेतला. मास्क जनता विकत घेते तर फक्त २० टक्के मास्क सरकार विकत घेते. त्यामुळे जनतेला दिलासा मिळणार नाही. आपण जनतेला दिलासा देण्यासाठी निर्णय घेतला पाहिजे, अशी भूमिका मंत्र्यांनी मांडल्याचे सूत्रांनी सांगितले. जर मास्तरच्या किमतीवर नियंत्रण आणले तर या कंपन्या उत्पादन बंद करून कृत्रिम टंचाई निर्माण करतील का? अशी शंका बैठकीत उपस्थित केली गेली. तेव्हा सरकारमध्ये असे अनेक अधिकारी आहेत जे या कंपन्यांना बरोबर कामाला लावतील असेही समजले. राजेश टोपे आणि राजेंद्र शिंगणे यांनी यासाठी बैठकीत प्रयत्नांची पराकाष्टा केली आणि हा निर्णय झाला असे एका वरिष्ठ सचिवाने सांगितले. अखेर मंत्रिमंडळाने एकमताने मास्कच्या किमतीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला.अकृषी विद्यापीठांमधील कर्मचाºयांना सातवा वेतन आयोगराज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुधारित वेतनश्रेणी १ नोव्हेंबर २०२० पासून लागू होईल.राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचाºयांना पाचव्या व सहाव्या वेतन आयोगानुसार ज्या पदांची वेतनश्रेणी अचूक आहे. तसेच ज्या पदांची पाचव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी योग्य आहे, मात्र सहाव्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेत सदर वेतनश्रेणीत बदल होऊन त्यानुसार सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी सुधारित झालेली आहे, अशा पदांना पाचव्या आयोगाची वेतनश्रेणी आधारभूत मानून त्यानुसार समकक्ष सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी अनुज्ञेय करून त्याप्रमाणे समकक्ष सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करण्यात येईल. राज्यातील ६ अकृषि (मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नागपूर) विद्यापीठात विद्यापीठ स्तरावर मुद्रणालये अस्तित्वात आहेत. या विद्यापीठ मुद्रणालयातील कर्मचाºयांची वेतन देण्याचे दायित्व विद्यापीठ निधीतून देण्यात येते. तथापि अशा कर्मचाºयांना वेतन आयोगाच्या सुधारित वेतनश्रेण्या शासन स्तरावरुन लागू करण्यात येतात. विद्यापीठ मुद्रणालयातील पदांना पाचव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी आधारभूत मानून त्यानुसार समकक्ष वेतनश्रेणी सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी १ जानेवारी २००६ पासून अनुज्ञेय करून मान्यता देण्यात आली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार