शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

coronavirus: अटी घालून आषाढीला परवानगी देण्याची वारकऱ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 05:46 IST

हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, वारकऱ्यांची आर्त साद 

- बाळासाहेब बोचरे मुंबई : हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, वारी चुकू न दे हरी, अशी आस मनी बाळगून असलेल्या वारकऱ्यांना नियमांच्या अधीन राहून आषाढीचा सुखसोहळा मोठ्या प्रमाणात नसला तरी प्रातिनिधिक स्वरूपात करून संत आणि देव यांच्या भेटीची परंपरा कायम राखावी, अशी भावनिक साद वैष्णवजणांमध्ये ऐकायला मिळत आहे.शासन आणि प्रशासन यंत्रणेला झेपेल तेवढ्या प्रमाणातच वारीला परवानगी द्यावी, शेकडो वर्षांच्या सोहळ््यात खंड पडू नये, अशीच भावना अनेकांनी लोकमतकडे व्यक्त केली. आषाढी एकादशीपर्यंत कोरोना आटोक्यात येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. पण सरकार अद्याप वारकºयांशी कसलीच चर्चा करत नाही, किंवा निर्णयही देत नसल्याने वारकºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहेपंढरपूरला आषाढी वारीसाठी सात संतांच्या मानाच्या पालख्या असतात. मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथून निघणारी संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे नियोजित प्रस्थान २७ मे रोजी आहे. तर १७ मे रोजी संत मुक्ताईचा समाधी सोहळा असल्याने त्याच दिवशी प्रस्थानाचीही तयारी केली जाते. त्यानंतर संत निवृत्तीनाथ महाराज (६ जून), संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांची पालखी (१२ जून) व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (१३ जून), संत सोपान काका (१८ जून) व संत नामदेव महाराजांची पालखी पंढरपूर येथूनच दशमीला प्रस्थान ठेवते.वारीमध्ये बहुतांश वारकरी हे वयोवृद्ध असतात. महामारीच्या या संकटात त्यांची जबाबदारी कोण घेणार? त्यापेक्षा शासनजसे सांगेल ते ऐकण्याशिवाय पर्याय नाही. प्रतीकात्मक पद्धतीने केवळ निवडक लोकांसमवेत पादुका घेऊन गेले तरी वारी पूर्ण होऊ शकते.- बाळासाहेब पवार- आरफळकर, मालक, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रशासनही तणावात आहे. वारीची परंपरा खंडित होणार नाही या पद्धतीने शासनाने नियोजन करावे.- ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, अध्यक्ष, समस्त वारकरी फडकरी- दिंडी संघटनाअगदी रझाकारांच्या काळातही पालखीवर संकटे आली. पण वारकºयांनी त्यावर मात केली. गेल्या ४२१ वर्षांत आमच्या सोहळ्यावर असे संकट आले नव्हते. नियमावली करून परवानगी दिली तर आम्ही शिस्तीने आणि जबाबदारीने सोहळा पार पाडू.- रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले, सोहळा प्रमुख,संत एकनाथ महाराज पालखी सोहळासुमारे सातशे वर्षांची परंपरा असलेला संत तुकाराम महाराजांचा पंढरपूर पालखी सोहळा कधी बंद पडला नाही. सरकारने परवानगी दिली तरी कमीत कमी लोकांमध्ये हा सोहळा पार पाडायचा. जास्त गर्दी होऊ द्यायची नाही, यावर आमचे एकमत झाले आहे.- बाळासाहेब मोरे, माजी सोहळाप्रमुख, संत तुकाराम पालखी सोहळापालखी सोहळ्यावर पूवीर्ही संकटे आली होती. परंतु पालखी सोहळा कधीच खंडित झालेला नाही. प्रशासनाच्या विरोधातही आम्हाला भूमिका घ्यायची नाही.- रविंद्र महाराज हरणे, सोहळा प्रमुख,संत मुक्ताबाई पालखी सोहळापोलीस प्रशासनाचे सहकार्य घेऊन संतमेळा घडला पाहिजे. प्रशासनानेही त्याचा अंदाज घ्यावा आणि परवानगी द्यावी.- मोहन महाराज बेलापूरकर,संत निवृत्तीनाथ पालखी सोहळा

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा