गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात कोरोनाबाधितांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. परंतु आता राज्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये ७१,७३६ जणांनी कोरोनावर मात केली. तर ४८,७०० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे चोवीस तासांत ५२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या चोवीस तासांत राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनामुक्त नागरिकांची नोंद झाली आहे. मुंबईतही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४३,४३,७२७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत एकूण ३६,०१७९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ६,७४७७० जणांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर आता ८२.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
Coronavirus Updates: ७१ हजारांहून अधिक नागरिक कोरोनामुक्त; महाराष्ट्राला आधार देणारा आकडा, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 21:14 IST
Coronavirus In Maharashtra : गेल्या काही दिवसांच्या तुलनेत रुग्णवाढीत झाली मोठी घट. महाराष्ट्रातून दिलासा देणारी बातमी आली समोर
Coronavirus Updates: ७१ हजारांहून अधिक नागरिक कोरोनामुक्त; महाराष्ट्राला आधार देणारा आकडा, पण...
ठळक मुद्देमहाराष्ट्रातून दिलासा देणारी बातमी आली समोरगेल्या काही दिवसांच्या तुलनेत रुग्णवाढीत झाली मोठी घट.