Coronavirus Updates: रात्री ८ पासून ते सकाळी ७ जमावबंदी, मॉल्स, रेस्टॉरंट बंद राहणार; नियमांचं उल्लंघन केल्यास...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 01:53 AM2021-03-28T01:53:34+5:302021-03-28T06:09:22+5:30

जमावबंदी मोडल्यास, थुंकल्यास १,००० रु. दंड

Coronavirus Updates: Crowds, malls, restaurants will be closed from 8 pm to 7 am; If the rules are violated ... | Coronavirus Updates: रात्री ८ पासून ते सकाळी ७ जमावबंदी, मॉल्स, रेस्टॉरंट बंद राहणार; नियमांचं उल्लंघन केल्यास...

Coronavirus Updates: रात्री ८ पासून ते सकाळी ७ जमावबंदी, मॉल्स, रेस्टॉरंट बंद राहणार; नियमांचं उल्लंघन केल्यास...

Next

मुंबई - राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार येत्या १५ एप्रिलपर्यंत पुन्हा काही निर्बंध कडक करण्यात आले आहेत. रविवारी रात्री ८ वाजेपासून जमावबंदी लागू करताना ती मोडल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. गर्दीच्या, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाईल. विनामास्क फिरल्यास पाचशे रुपये दंड पडेल. रात्री ८ पासून ते सकाळी ७ पर्यंत या जमावबंदी लागू असल्याच्या काळात उद्याने, समुद्रकिनारे, मॉल्‍स, सर्व सिनेमागृहे, रेस्‍टॉरंट  बंद राहणार आहेत.

जमावबंदी काळातील कडक उपाययोजना

  • रात्री ८ पासून ते सकाळी ७ पर्यंत उद्याने आणि चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक स्थळे बंद. जमावबंदीचे उल्लंघन केल्यास प्रति व्यक्ती एक हजार रुपये दंड.
  • मास्कशिवाय फिरणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपये दंड. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड. 
  • सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही. नाट्यगृहे आणि सभागृहे अशा कार्यक्रमांसाठी वापरल्यास कारवाई.  नाट्यगृह, सभागृहे कोरोनाकाळ संपेपर्यंत बंद. 
  • सर्व सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन्स बंद. 

 

होम डिलिव्हरी जमावबंदी काळात बंद. नियमांचे जमावबंदी मोडल्यास, थुंकल्यास एक हजार रु. दंड हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह किंवा मल्टिप्लेक्सच्या मालकांनी उल्लंघन केल्यास ते कोरोना संकट संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील. लग्नकार्यात ५०, अंत्यविधीसाठी २० व्यक्तींची मर्यादा. नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई. काही बंधनांसह सार्वजनिक वाहतूक सुरू. मात्र नियमांचे उल्लंघन केल्यास ५०० रुपये दंड. खासगी आस्थापनांमध्ये (आरोग्य व आवश्यक सेवा वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थितीची मर्यादा. शासकीय व निमशासकीय कार्यालयांना त्यांचे विभाग किंवा कार्यालय प्रमुख परिस्थिती विचारात घेऊन कर्मचारी संख्या निश्चित करतील. सर्व सामाजिक, सांस्‍कृतिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी. सरकारी कार्यालयांमध्ये फक्‍त लोकप्रतिनिधींना प्रवेश. इतर अभ्‍यागतांना केवळ अत्‍यावश्यक कामासाठीच प्रवेश. ज्‍यांना बैठकांसाठी बोलावण्यात आले असेल, त्‍यांना विशेष पासेस देण्यात येतील. 


होम आयसोलेशनबाबत...
घरीच विलगीकरण (होम आयसोलेशन) बाबतीत कोणत्या डॉक्टरच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत, ते स्थानिक प्रशासनाला कळवावे लागेल. गृह विलगीकरणात सर्व काळजी घेण्याची जबाबदारी त्या डॉक्टरची राहील. रुग्णाने विलगीकरणाच्या नियमांचा भंग केल्यास संबंधित डॉक्टरवर त्याची माहिती लगेच स्थानिक प्रशासनाला कळविण्याची जबाबदारी राहील. त्या डॉक्टरला अशा परिस्थितीत संबंधित रुग्णाच्या उपचार व देखरेखीच्या कामातून मुक्त होता येईल.

उपाहारगृहे बंद राहतील; मात्र या वेळात ‘होम डिलिव्हरी’ सुरू राहील. नियमभंग केल्यास कोविड साथ असेपर्यंत बंद करण्यात येईल व दंडही ठोठावण्यात येईल. कोविड रुग्ण असल्याबाबत संबंधित स्थळी दरवाजावर १४ दिवसांसाठी तसा सूचनाफलक लावण्यात येईल. गृह विलगीकरण शिक्काही रुग्णाच्या हातावर मारण्यात येईल.

धार्मिक स्‍थळांवर प्रवेश मर्यादित
धार्मिक स्‍थळांवर जागेची उपलब्‍धता आणि शारीरिक अंतर लक्षात घेउन प्रत्‍येक तासाचे प्रवेश संबंधित व्यवस्‍थापनांनी निश्चित करावे. धार्मिक स्थळ आणि त्यांच्या ट्रस्टींनी कमीत कमी भाविकांना मंदिरात दर्शन कसे देता येईल यावर लक्ष केंद्रीत करावे.

ऑनलाईन दर्शनाची सुविधा देण्यात यावी. मंदिरात येणाऱ्यांनी कोरोना नियमांची त्रिसूत्री पाळली की नाही, ते पाहूनच मंदिरात प्रवेश द्यावा, असे आदेशात म्हटले आहे.

 

Web Title: Coronavirus Updates: Crowds, malls, restaurants will be closed from 8 pm to 7 am; If the rules are violated ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.