शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Update : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ; मृत्यूंचा आकडाही वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 21:40 IST

Coronavirus In Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ.

ठळक मुद्देराज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ.८९५ रुग्णांचा कोरोनामुळे झाला मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परंतु सोमवारी कोरोनाबाधितांची संख्या तुलनेनं कमी प्रमाणात वाढली होती. तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही अधिक होती. परंतु आता पुन्हा एकदा राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून गेल्या चोवीस तासांत राज्यात ६६,३५८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या संख्येतही वाढ झाली. गेल्या चोवीस तासांत राज्यात ८९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.एकीकडे गेल्या चोवीस तासांत राज्यात ६६,३५८ नव्या रुग्णांची वाढ झाली, तर दुसरीकडे ६७,७५२ जणांनी कोरोनावर मात केली. राज्यात सध्या ६,७२,४३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८३.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ३६,६९,५४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.मुंबईत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिकगेल्या चोवीस तासांत मुंबईत ४,०१४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर याच्या दुपटीपेक्षा अधिक लोकांनी कोरोनावर मात केली. गेल्या चोवीस तासांत मुंबईत ८,२४० जणांनी कोरोनावर मात केली. सध्या राज्यात ६६,०४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीता कालावधी ६८ दिवस इतका झाला आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई