गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर ही साखळी तोडण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परंतु राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत तितकीची घट होताना दिसत नाही. गेल्या चोवीस तासांत राज्यात राज्यात ६३,३०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ९८५ रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६३,३०९ नवे कोरोनाबाधित सापडले. तर दुसरीकडे ६१,१८१ जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत एकूण ३७,३०,७२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात ६,७३,४८१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ८३.४ टक्क्यांवर आला आहे.
Coronavirus Update : चोवीस तासांत राज्यात ६३,३०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ९८५ मृत्यूंची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 21:59 IST
राज्यात पुन्हा मृत्यूंच्या संख्येत झाली वाढ. गेल्या काही दिवासांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद.
Coronavirus Update : चोवीस तासांत राज्यात ६३,३०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ९८५ मृत्यूंची नोंद
ठळक मुद्देराज्यात पुन्हा मृत्यूंच्या संख्येत झाली वाढगेल्या काही दिवासांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद