शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Update : २४ तासांत राज्यात ५,४२४ रुग्णांची कोरोनावर मात; रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांच्या जवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 22:31 IST

Coronavirus In Maharashtra : चोवीस तासांत नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक. रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांच्या जवळ.

ठळक मुद्देचोवीस तासांत नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक. रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांच्या जवळ.

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता. परंतु आता राज्य त्यातून बाहेर येताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची अधिक नोंद करण्यात आली. चोवीस तासांत राज्यात ५ हजार ४२४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ४ हजार ४०८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ११६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

आजपर्यंत राज्यात एकूण ६२,०१,१६८ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८७ टक्क्यांवर पोहोचले आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ६४,०१,२१३ कोरोनाबाधितांची नोंद झाली.मुंबईतही कोरोनामुक्त अधिकमुंबईतही आता कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईतही कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असल्याचं दिसून आलं. गेल्या चोवीस तासांत मुंबईत १९८ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ३०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या २,६४० रूग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण दुपटीचा कालावधी आता १९८६ दिवस इतका झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका