शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: पनवेलहून मध्य प्रदेश, ओडिशा राज्यात दोन विशेष रेल्वे रवाना होणार; मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 06:04 IST

शनिवारी १ हजार १४३ मजुरांना घेऊन ओडिशा राज्यात रवाना झाली. त्याचबरोबर रात्री एक विशेष रेल्वे बाराशे मजुरांना घेऊन मध्यप्रदेश राज्यात जाणार आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सुमारे एक हजार २०० मजुरांना ओडिशा राज्यात गुरुवारी घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला ओडिशा सरकारने परवानगी नाकारल्याने जिल्हा प्रशासनाला ही रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. मात्र आता हिच रेल्वे शनिवारी १ हजार १४३ मजुरांना घेऊन ओडिशा राज्यात रवाना झाली. त्याचबरोबर रात्री एक विशेष रेल्वे बाराशे मजुरांना घेऊन मध्यप्रदेश राज्यात जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून तीन विशेष रेल्वे मध्यप्रदेश आणि बिहार राज्यात या आधीच सोडण्यात आल्या होत्या.दोन दिवसांपूर्वी ओडीसा उच्च न्यायालयाने परराज्यातून येणाºया नागिकांना राज्यात घेण्यास मनाई केली होती. या निर्णयाच्या विरोधात ओडिसा सरकारने सर्वाच्य न्यायालयात दाद मागीतली होती. त्यानुसार सर्वाच्य न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे आता ओडिशा राज्यात जाणाऱ्यांसाठी मार्ग मोकळा झाला आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार देशभरात लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या परराज्यातील मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि यात्रेकरु ंना त्यांच्या राज्यात, जिल्ह्यात जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार परराज्यातील मजूरांना टप्प्याटप्प्याने त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.ओडिशा हायकोर्टाने कोव्हीड-१९ टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतरच ओरीसा राज्यात या मजुरांना प्रवेश देण्याचे आदेश काढले. त्यामुळे अचानक ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेण्याची वेळ येथील प्रशासनावर आली. ओरिसा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या सर्व नागरिकांची कोव्हीड-१९ टेस्ट करणे शक्य नव्हते. त्यामुळे ओरिसा सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने ओरिसा उच्च न्यायालयाचे आदेश ‘व्यवहार्य’ नसल्याचे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिल्याची माहिती अतिरीक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.जिल्ह्यात अडकलेल्या मजुरांना घेऊन आणखी एक जाणारी विशेष ट्रेन पनवेल येथून रात्री आठ वाजता मध्यप्रदेशला सोडण्यात येणार आहे. त्यामुळे या मजुरांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये अलिबागमधील १५६ मजुरांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे महाड-२३, माणगाव-२९ म्हसळा-२२, पेण-६७३, पोलादपूर-१९ रोहो-१४३, श्रीवर्धन-६, सुधागड-६४ तळा तालुक्यातील ८ अशा एकूण एक हजार १४३ मजुरांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाचे चिटणीस विशाल दौंडकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसalibaugअलिबाग