शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

Coronavirus : तिसरी लाट सुसाट! राज्यात एकाच दिवशी ३९०० रुग्ण;  घरातच साजरा करा थर्टी फर्स्ट, सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 6:54 AM

Coronavirus: कोरोनाच्या मागील दोन लाटांच्या तुलनेत हे प्रमाण चिंताजनक असले तरीही रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. 

मुंबई : वर्षाखेरीस पुन्हा एकदा राज्यासह मुंबईत कोरोनाने डोके वर काढले आहे. दैनंदिन रुग्णसंख्येची संख्येची दोनशेपर्यंत झालेली घसरण आता तेराशेच्या पार गेली आहे. मुंबईत अवघ्या चार दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्या ६८३ वरुन १,३७७ झाली आहे. कोरोनाच्या मागील दोन लाटांच्या तुलनेत हे प्रमाण चिंताजनक असले तरीही रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. 

मुंबई महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या ७०६ वरुन १,३७६ वर जाण्यास १२ दिवसांचा कालावधी लागला. तर दुसऱ्या लाटेत ६८३ असणाऱ्या दैनंदिन रुग्णसंख्या १,३२५ वर पोहोचण्यासाठी २० दिवसांचा कालावधी लागला होता. मात्र २०२१ च्या अखेरीस येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेत कमी कालावधीत रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे.

मुंबईत ५ हजारांहून अधिक, तर ठाण्यात १,५०२ सक्रिय रुग्ण मुंबईत सध्या ५ हजार ८०३ रुग्ण उपचाराधीन आहेत, तर मुंबईत अन्य कारणांमुळे ओढावलेल्या मृत्यूंची संख्या २,५६३ आहे. तर ठाणे जिल्ह्यात सध्या १,५०२ सक्रिय रुग्ण आहेत. रायगड जिल्ह्यात २९६ रुग्ण सक्रिय आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सतर्क राहा. घाबरून जाऊ नका. आपल्या सुरक्षेसाठी शिस्त पाळा. मुंबईतील हॉटेल्सना ५० टक्के क्षमतेने  सुरू राहण्याची परवानगी आहे. हॉटेल्स आणि बंदिस्त ठिकाणी असलेल्या कार्यक्रमावर  लक्षात ठेवण्यासाठी भरारी पथक कार्यरत आहेत. तसेच सीसीटीव्ही फुटेजही मागवण्यात येतील.- इकबाल सिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका

दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असली तरीही रुग्णालयात दाखल होण्याची गरज लागणाऱ्या बाधितांचे प्रमाण कमी आहे. खबरदारी म्हणून कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. लक्षणे जाणवल्यास निदान, विलगीकरण आणि उपचारांना प्राधान्य द्या. सध्या संसर्गाच्या स्थितीचे विश्लेषण करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर अचूक व शास्त्रीय पद्धतीने तिसऱ्या लाटेचे विश्लेषण करता येईल.- डॉ. अविनाश सुपे, राज्य कोरोना टास्क फोर्स

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOmicron Variantओमायक्रॉन