शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: थँक्यू महिंद्रा! केवळ ४८ तासांत बनविले व्हेंटिलेटरचे प्रारूप; खर्च अवघा ७५०० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 18:49 IST

CoronaVirus in Mumbai महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रांनीच ही आनंदाची वार्ता दिली आहे. कंपन्या बंद किंवा कमी कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक कामे सुरु ठेवण्यात आली आहेत. या वेळाचा सदुपयोग महिंद्राच्या इगतपुरी आणि मुंबईतील कर्मचाऱ्यांनी केला आहे.

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे देशाला पुढील काही दिवसांत वैद्यकीय उपकरणांची तीव्र गरज लागणार आहे. केंद्र सरकारने १९ मार्चला मास्क आणि व्हेंटिलेटरची निर्यात थांबविली आहे. तर आता सैन्य दलासाठी दारुगोळा, शस्त्रे पुरविणाऱ्या सरकारी फॅक्टरींना मास्क आणि व्हेंटिलेटर बनविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महिद्रा आणि महिंद्रा या वाहन निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या कंपनीकडून आनंदाची बातमी आली आहे. 

महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रांनीच ही आनंदाची वार्ता दिली आहे. कंपन्या बंद किंवा कमी कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक कामे सुरु ठेवण्यात आली आहेत. या वेळाचा सदुपयोग महिंद्राच्या इगतपुरी आणि मुंबईतील कर्मचाऱ्यांनी केला आहे. कोणत्याही महामारीवेळी व्हेंटिलेटरची खूप मोठी गरज असते. मात्र हा व्हेंटिलेटर ५ ते १० लाखांपासून सुरू होतो. यामुळे बऱ्याच रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर ठेवले जात नाहीत. यामुळे रुग्णाचा जीवही धोक्यात येतो. 

कोरोनाशी लढण्यासाठी मास्क आणि व्हेंटिलेटरची नितांत आवश्यकता आहे. मास्क एकवेळ कोणीही बनवू शकतो, परंतू व्हेंटिलेटर बनविणे सोपे काम नाही. यामुळे महिंद्रांच्या या दोन ठिकाणच्या टीमनी केवळ ४८ तासांमध्ये व्हेंटिलेटर बनवत आरोग्य यंत्रणेला खूप मोठा दिलासा दिला आहे. त्यांनी या व्हेंटिलेटरचे प्रारुप तयार केले असून याचा व्हिडीओ खुद्द आनंद महिंद्रांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. 

या इंजिनिअरांनी व्हेंटिलेटर काम कसे करतो, याची माहिती इंटरनेटवरून मिळविली आणि तसे पार्ट बनवून काही चआधीच उपलब्ध असलेले पार्ट वापरून हा व्हेंटिलेटर तयार केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा व्हेंटिलेटर बनविण्यासाठी त्यांना अवघा ७५०० रुपयांचा खर्च आला आहे. आता यावर हे इंजिनिअर काम करणार असून असे आणखी तीन व्हेटिलेटर तयार केले जाणार आहेत. यामुळे कोरोनाशी झगडणाऱ्या रुग्णांना मोठी मदत मिळणार आहे. हे काम पुढील दोन ते तीन दिवसांत पूर्ण केले जाणार आहे. 

टॅग्स :Mahindraमहिंद्राCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याAutomobile Industryवाहन उद्योग