शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: राज्याकडे साथरोग नियंत्रणाची माहितीच नाही; एमएसआरडीसीवर सोपविली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 02:21 IST

कोरोनाचे करणार अभ्यासपूर्ण डॉक्युमेंटेशन

नारायण जाधव

ठाणे : देशात किंवा राज्यात कोरोनापूर्वी येऊन गेलेल्या इतर महामारींसह साथरोगांवर कशाप्रकारे नियंत्रण मिळविले, कोणकोणत्या उपाययोजना केल्या, याची कोणतीही माहिती महाराष्ट्राकडे नाही. यामुळे सध्या जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनावर नियंत्रण मिळवितांना सरकारच्या नाकीनऊ आले आहेत.

हा साथरोग राज्यासह संपूर्ण जगाला नवीन असून त्यावर औषधही नाही. यामुळे कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठी आतापर्यंत लॉकडाऊनसह जगातील इतर देशांनी किंवा भारतातील इतर राज्यांनी कोणत्या उपाययोजना राबविल्या याचा अभ्यास करून महाराष्ट्राचा आरोग्य विभाग मार्गक्रमण करीत आहे. मात्र, भविष्यात अशाप्रकारे एखादी महामारी उद्भवल्यास त्यावर सुयोग्य नियंत्रण मिळविता यावे यासाठी कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे डॉक्युमेंटेशन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.राज्याच्या आरोग्य विभागासह शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस आणि जिल्हा यंत्रणा आणि राज्याच्या मंत्रीगटाने कोणकोणत्या उपाययोजना सुचविल्या, कोणत्या राबविल्या, कोणत्या योजना यशस्वी झाल्या, त्यासाठी कायकाय केले, याचा अभ्यास करून सुयोग्य असे डॉक्युमेंटेशन तयार करण्यास एमएसआरडीसी अर्थात रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना सांगितले आहे. यात विविध औषधी,थेरपींचा कोरोना नियंत्रणासाठी कसा उपयोग झाला, हे पुराव्यानिशी या डॉक्युमेंटेशनमध्ये असणार आहे.

होमिओपॅथिक अर्सेनिक अल्बमपासून आयुर्वेदीक काढे, औषधी ते रेमडेसिवीर, प्लाझ्मा थेरेपीपर्यंतची अभ्यासपूर्ण मांडणी करण्यास एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांना सांगितले आहे. यासाठी त्यांनी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कृती गट स्थापून त्याने राज्य शासनाने आणि शहरी , ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसह पोलीस आणि जिल्हा यंत्रणा आणि राज्याच्या मंत्रीगटाशी संपर्क साधून त्यांनी केलेल्या, सुचविलेल्या बेस्ट प्रॅक्टिसेसचे डॉक्युमेंटेशन करावे. याचा सर्व खर्च एमएसआरडीसीनेच करायचा आहे.मुंबईसह पुणे महानगर प्रदेशातील साथीचा अभ्यासएमएसआरडीसीचे हे पथक प्रामख्याने पुणे आणि मुंबई महानगर प्रदेशातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह इतर औरंगाबाद, मालेगांवसारख्या शहरांत कोरोनाची साथ कशामुळे पसरली, त्याची प्रमुख कारणे, धारावी झोपडपट्टीत कोरोना पसरण्याचे आणि नियंत्रणात येण्याची कारणे काय, लॉकडॉऊनचा कितपत उपयोग झाला, प्रवासी मजुरांचे स्थलातंर, त्याचे चांगले-वाईट परिणाम याचा अभ्यास करून त्याचाही या डॉक्युमेंटेशनमध्ये समावेश करणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार