शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

Coronavirus News: ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; कोरोना उपचारांसाठी रेमडेसिवीरची १० हजार इंजेक्शन्स खरेदी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 15:47 IST

coronavirus News: अमेरिकेच्या एफडीएकडून रेमडेसिवीरच्या आपत्कालीन स्थितीतील वापराला परवानगी

मुंबई: ठाकरे सरकार रेमडेसिवीर औषधाची १० हजार इंजेक्शन खरेदी करणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिवीरचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सुचवलं असल्याचं टोपेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळेच राज्य सरकार या औषधाची इंजेक्शन्स खरेदी करणार असल्याची माहिती टोपेंनी ट्विटमधून दिली आहे.  'महाराष्ट्र शासन रेमडेसिवीरची १० हजार इंजेक्शन खरेदी करणार आहे. प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे MERS- CoV आणि SARS मध्ये यास आशादायक परिणाम मिळाला आहे, जो देखील कोरोना व्हायरसमुळे होतो. कोविड-१९ च्या उपचारात रेमडेसिवीरचे काही सकारात्मक परिणाम होऊ शकतात, असं जागतिक आरोग्य संघटना सुचवते. हे औषध अत्यंत महाग असून गरीब लोकांना देण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली,' असं राजेश टोपेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. रेमडेसिवीर औषधाची विक्री करण्याची परवानगी अमेरिकन कंपनी जिलाद सायन्सेसनं आठवड्यापूर्वीच भारत सरकारकडे मागितली आहे. तत्पूर्वी अमेरिकेतल्या संशोधकांनी महिनाभर रेमडेसिवीर आणि या औषधाचा कोरोना रुग्णांवरील उपचारातील उपयोग यावर संशोधन केलं. कोरोनावरील उपचारांमध्ये रेमडेसिवीरचा वापर करू देण्याची मागणी डॉक्टर अनेक दिवसांपासून करत आहेत. रेमडेसिवीर औषध कोरोना रुग्णांवरील उपचारांत प्रभावी ठरत असल्याचं अमेरिकेत आढळून आलं आहे. मात्र यावर भारतात अद्याप तरी कोणतंही संशोधन झालेलं नाही.प्रकृती अतिशय गंभीर असलेल्या कोरोना रुग्णांवरील उपचारांदरम्यान रेमडेसिवीरचा वापर परिणामकारक ठरत असल्याचं अमेरिकेत झालेल्या संशोधनातून समोर आलं आहे. अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनानं (यूएसएफडीए) आपत्कालीन परिस्थितीत रेमडेसिवीरचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. ...तर भारतातील कोरोना रुग्णांची संख्या १९ लाखांपेक्षा जास्त असेल; ट्रम्प यांचा दावादेशात एका दिवसात कोरोनाचे तब्बल 9887 नवे रुग्ण, 294 जणांचा मृत्यू; चिंताजनक आकडेवारीकोरोनाच्या लढ्यात WHO ने जारी केल्या मास्क संदर्भात नव्या गाईडलाईन्स

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEbolaइबोलाRajesh Topeराजेश टोपेWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना