शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 12:43 IST

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: कोरोना संकट काळात राज्य सरकारनं विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. व्यवसायिक/बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या/शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे. विद्यापीठांनी ठरवलेल्या सुत्रानुसार शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना पदवी दिली जाईल. मुख्यमंत्री कार्यालयानं ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. व्यवसायिक आणि बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या/अंतिम सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करत असल्याची माहिती ठाकरे सरकारनं पंतप्रधान मोदींना पत्राद्वारे दिली आहे. या विद्यार्थ्यांना विद्यापीठानं ठरवलेल्या सुत्रानुसार पदवी देण्यात येईल. यासाठी मोदींनी संबंधित अभ्यासक्रमांच्या शिखर संस्थांना योग्य त्या सूचना द्याव्यात, असं आवाहन ठाकरे सरकारकडून करण्यात आलं आहे.  व्यवसायिक आणि बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांबद्दलचे निर्णय घेणाऱ्या ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर, बार काऊन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल काऊन्सिल फॉर टीचर एज्युकेशन आणि नॅशनल काऊन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या शिखर संस्थांना राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देण्याचे आदेश मोदींनी द्यावेत, असं आवाहन ठाकरे सरकारकडून पत्रातून करण्यात आलं आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याआधी पंतप्रधान मोदींनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचं आवाहन पत्राद्वारे केलं होतं. एमडी, एमएस, डीएम परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेश मोदींनी मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाला द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पत्रातून केली होती. अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी कोरोना संकटाच्या काळात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. निवासी डॉक्टर म्हणून ते सध्या मोलाची कामगिरी करत आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलून त्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांनी केली होती.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या