शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: राज्याला आज कोरोनापासून किंचित दिलासा! रुग्णांची संख्या घटली, २५८ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 21:31 IST

आज कोरोनाच्या १० हजार ४४१ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांचा आकडा हा ६ लाख ८२ हजार ३८३ वर पोहोचला आहे. तर आज झालेल्या २५८ मृत्यूंमुळे राज्यातील मृतांची संख्या २२ हजार २५३ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देआज राज्यामध्ये कोरोनाच्या १० हजार ४४१ रुग्णांची नोंद दिवसभरात राज्यात २५८ रुग्णांचा मृत्यू राज्यात आज दिवसभरात ८ हजार रुग्णांनी १५७ रुग्णांनी कोरोनावर केली मात

मुंबई - शनिवारच्या तुलनेत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये आज लक्षणीय घट झाली असून, आज राज्यामध्ये कोरोनाच्या १० हजार ४४१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात राज्यात २५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज दिवसभरात ८ हजार रुग्णांनी १५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तसेच राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे ७१.५५ टक्क्यांवर पोहोचले आहे.आज कोरोनाच्या १० हजार ४४१ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांचा आकडा हा ६ लाख ८२ हजार ३८३ वर पोहोचला आहे. तर आज झालेल्या २५८ मृत्यूंमुळे राज्यातील मृतांची संख्या २२ हजार २५३ वर पोहोचली आहे.कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच बऱ्या होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.५५ टक्क्यांवर पोहोचले आहे. आज ८ हजार १५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८८ हजार २७१ रुग्ण बरे झाले आहेत. आज १० हजार ४४१ नविन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या १ लाख ७१ हजार ५४२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ लाख १६ हजार ७०४ नमुन्यांपैकी ६ लाख ८२ हजार ३८३ नमुने पॉझिटिव्ह (१८.८६ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ३० हजार ९८२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ८२० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२६ टक्के एवढा आहे.आज निदान झालेले १०,४४१ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २५८ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९९१ (३४), ठाणे- १५० (१), ठाणे मनपा-१४३ (४), नवी मुंबई मनपा-३४८ (८), कल्याण डोंबिवली मनपा-२१५, उल्हासनगर मनपा-१३ (७), भिवंडी निजामपूर मनपा-१५ मीरा भाईंदर मनपा-११२ (३), पालघर-२११ (२), वसई-विरार मनपा-१३७ (१), रायगड-१९७ (२), पनवेल मनपा-१३८, नाशिक-२२६ (३), नाशिक मनपा-१२२ (७), मालेगाव मनपा-३८ (२), अहमदनगर-२६६ (९),अहमदनगर मनपा-२३१ (३), धुळे-२०, धुळे मनपा-३४ (४), जळगाव-४८७ (२), जळगाव मनपा-१४० (२), नंदूरबार-११९, पुणे- ५६९ (११), पुणे मनपा-१२८८ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-६७९ (१६), सोलापूर-२७६ (५), सोलापूर मनपा-४० (१), सातारा-२५३ (७), कोल्हापूर-३४३ (१२), कोल्हापूर मनपा-१७९ (१), सांगली-१५० (६), सांगली मिरज कुपवाड मनपा-१७५ (५), सिंधुदूर्ग-० (१), रत्नागिरी-३६ (२), औरंगाबाद-३६ (३),औरंगाबाद मनपा-३४ (४), जालना-९० (३), हिंगोली-६४, परभणी-३२, परभणी मनपा-५४ (१), लातूर-१०५ (५), लातूर मनपा-४१ (१), उस्मानाबाद-१८३ (४),बीड-८१ (५), नांदेड-४९ (१), नांदेड मनपा-१६ (३), अकोला-१८, अकोला मनपा-६, अमरावती-३३, अमरावती मनपा-३६ (१), यवतमाळ-५९ (२), बुलढाणा-६१, वाशिम-३३, नागपूर-१३८, नागपूर मनपा-६८० (२२), वर्धा-१६, भंडारा-१४ (१), गोंदिया-२२, चंद्रपूर-४४ (१), चंद्रपूर मनपा-३५, गडचिरोली-१४, इतर राज्य १६.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई