शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

CoronaVirus News: "फडणवीस, एका ट्रेनसाठी ५० लाखांचा खर्च कसा आणि कुठून येतो?; जरा आम्हालाही सांगा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 18:49 IST

फडणवीस यांच्या आकडेवारीला आणि आरोपांना महाविकास आघाडीकडून जोरदार प्रत्युत्तर

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केलेल्या दाव्यांना आज महाविकास आघाडी सरकारनं प्रत्युत्तर दिलं. केंद्राकडून राज्याला भरीव मदत मिळाली. मात्र तरीही राज्य सरकार अपयशी ठरलं, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यांनी दिलेल्या आकडेवारीचा राज्य सरकारच्या मंत्र्यांनी समाचार घेतला. शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस यांना जोरदार प्रतुत्तर दिलं.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल आभासी पत्रकार परिषद घेतली. आम्ही प्रत्यक्ष उत्तर देतोय. आम्ही आभास निर्माण करत नाही. प्रत्यक्ष उत्तर देतो. केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत करतंय. तरी राज्य सरकार अपयशी ठरतंय, असा फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेचा मतितार्थ होता. मात्र ते आकडेवारीतून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी जोरदार पलटवार केला.'केंद्राकडून राज्याला गहू, तांदूळ आणि डाळ मिळाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रानं संपूर्ण देशाला अन्नधान्य दिलं. एकट्या राज्याला नाही. त्यातही १७५० कोटी रुपयांचा गहू राज्याला मिळालेला नाही. १२२ कोटींचं अन्नधान्य स्थलांतरित मजुरांना दिल्याचं फडणवीस सांगतात. त्याचे आदेश चार दिवसांपूर्वी निघाले आहेत आणि बहुतांश मजूर त्यांच्या गावी परतले आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून १७२६ कोटींचा निधी दिल्याचं फडणवीस म्हणाले. पण ही योजना आजची नाही. आधीपासूनची आहे. कोरोना काळात केंद्रानं कोणतीही वेगळी मदत राज्याला केलेली नाही. यापेक्षा वेगळी मदत फडणवीस यांनी केंद्राकडून आणली असती, तर आम्ही त्यांचं अभिनंदनच केलं असतं, असा टोला परब यांनी लगावला.देवेंद्र फडणवीस केवळ फुगवून आकडे सांगतात, असा दावा करत अनिल परब यांनी विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना केंद्राकडून देण्यात आलेल्या ११६ कोटी रुपयांचा संदर्भ दिला. विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या मदतीचा केवळ २० टक्केच हिस्सा केंद्र देतं. बाकीचा ८० टक्के हिस्सा राज्य सरकार देतं. केंद्र ११६ कोटी देत असताना राज्यानं १ हजार २१० कोटी दिले, हे फडणवीस यांनी सांगायला हवं होतं, असं परब म्हणाले.सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मजुरांसाठी सोडल्या जाणाऱ्या श्रमिक विशेष गाड्यांवरून वाद सुरू आहे. त्यावरूनही परब यांनी फडणवीस यांना लक्ष्य केलं. महाराष्ट्रातून ६०० गाड्या सुटल्या. प्रत्येक गाडीवर ५० लाख खर्च केले, असं फडणवीस सांगतात. एका ट्रेनला ५० लाखांचा खर्च कसा आणि कुठून येतो, याचं उत्तर फडणवीस यांनी द्यावं, असं परब यांनी म्हटलं.राज्य सरकारनं ८० ट्रेन मागितल्या. पण रेल्वे मंत्रालयानं त्या दिल्या नाहीत, याचा पियूष गोयल यांना इतका राग आला की त्यांनी १५२ गाड्या एकाच दिवसात दिल्या. बंगालसाठी आम्हाला महिन्याभरात ४८ गाड्या सोडायच्या आहेत. दिवसाला दोन गाड्याच पाठवा, अशी विनंती बंगाल सरकारनं वादळाच्या पार्श्वभूमीवर केली आहे. मात्र तरीही एकाच दिवशी ४३ गाड्या पाठवून गर्दी निर्माण केली आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप परब यांनी केला.फडणवीस, तुम्हाला मोदींवर भरवसा नाय का? जयंत पाटलांचा माजी मुख्यमंत्र्यांना चिमटाविरोधकांकडून सरकारला बदनाम करायचं काम; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल"काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही राहुल गांधींचं ऐकत नाही"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnil Parabअनिल परबBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातJayant Patilजयंत पाटील