शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

coronavirus: क्षयाच्या गंभीर रुग्णांना कोरोनाचा धोका कमी , तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 07:17 IST

तोंडातील उडालेल्या बिंदुकांच्या संपर्कातून टीबी होऊ शकतो, अशाच प्रकारे कोरोना संसर्गाची बाधा होत असल्याचेही समोर आले आहे. याबाबत डॉ. आनंदे यांनी सांगितले की, अ‍ॅक्टिव्ह पीटीबी टीबी झालेल्या गंभीर रुग्णांना कोरोनाचा धोका कमी आहे.

मुंबई : ज्येष्ठ नागरिक आणि अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनाच्या संसर्गाचा अधिक धोका असल्याचे म्हटले जाते आहे. मात्र क्षयाच्या गंभीर रुग्णांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी असल्याचे श्वसनविकारतज्ज्ञांचे मत आहे. शिवडी क्षय रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. ललीतकुमार आनंदे यांनी याविषयी निरीक्षण मांडले आहे. क्षयरोग आणि कोरोनाच्या लक्षणांमध्ये साम्य असल्याचे आढळले आहे.तोंडातील उडालेल्या बिंदुकांच्या संपर्कातून टीबी होऊ शकतो, अशाच प्रकारे कोरोना संसर्गाची बाधा होत असल्याचेही समोर आले आहे. याबाबत डॉ. आनंदे यांनी सांगितले की, अ‍ॅक्टिव्ह पीटीबी टीबी झालेल्या गंभीर रुग्णांना कोरोनाचा धोका कमी आहे. अ‍ॅक्टिव्ह पीटीबी रुग्णांना कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संपर्काचा परिणाम होऊ शकत नाही. कोरोना संसर्गामुळे शिवडीतील टीबी रूग्णालयात दाखल झालेल्या पीटीबी रुग्णांच्या मृत्यू दरात वाढ होईल, अशी भीती होती. एकूण दाखल रुग्णांपैकी दररोज सुमारे १०० ते २०० पर्यंत रुग्णांचा मृत्यू होईल, अशी भीतीही व्यक्त होत होती. मायक्रोबॅक्टीरियम म्हणजेच क्षय कोरोना विषाणूला थारा देत नाही. त्यामुळे या रुग्णांना कोरोना विषाणूंची लागण होताना दिसत नाही. टीबी रुग्णालयात ४५० हून अधिक रुग्ण आहेत. कोरोना चाचणीत केवळ एक एक्सडीआर टीबी प्रकरणातील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडला.क्षयग्रस्त इम्युनोकोम्प्रमाइज्ड असतात, तसेच त्यांच्या फुप्फुसाचे अर्धे किंवा पूर्ण नुकसान झालेले असते. त्यामुळे या रुग्णांना कोरोना विषाणूंचा फटका बसेल असे वाटत होते. मात्र असे काहीही झाले नसल्याचे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. योगेश पिंगळे यांनी सांगितले. क्षय रुग्णांना विलगीकरण किंवा संपर्क टाळण्याचा सल्ला दिला जातो. त्यांच्यावरही विलगीकरण मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपचार करण्यात येतात.संशोधनाची गरजक्षय रुग्णांना जी औषधे दिली जातात त्यांचा हा परिणाम असण्याची शक्यता डॉ. आनंदे यांनी व्यक्त केली. क्षयामुळे रुग्णाच्या श्वसनमार्गामधील सिलिया खराब होतो. त्यामुळे तो अशा रुग्णाच्या आत शिरलेल्या विषाणूला तेथे थांबू देत नाही हेदेखील एक कारण असण्याची शक्यता आहे. मात्र यावर अधिक संशोधन होण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य