शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

coronavirus: राज्यात रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टद्वारे पंधरा मिनिटांत होणार कोरोनाचे निदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 07:31 IST

या चाचणीला आयसीएमआरसह आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सनेही मान्यता प्रदान केली आहे. ही चाचणी रुग्ण असलेल्या जागेवर निदानासाठी नाकातील स्राव घेतल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली एक तासाच्या आत करावी लागते.

- राजेश भोजेकरचंद्रपूर : कोविड-१९ साठी आरटीपीसीआर ही एकमेव निदान चाचणी आहे. यामध्ये बराच वेळ लागतो. कार्टिजची अनुपलब्धता व जास्तीचा खर्च ही या चाचणीची उणे बाजू आहे. आता वेळ व खर्चाच्या बचतीचा ‘रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट’चा पर्याय पुढे आला आहे. राज्य शासनानेही चाचणीचा पर्याय निवडला असून, अवघ्या १५ मिनिटांत कोरोनाचे निदान होणार आहे.या चाचणीला आयसीएमआरसह आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सनेही  मान्यता प्रदान केली आहे. ही चाचणी रुग्ण असलेल्या जागेवर निदानासाठी नाकातील स्राव घेतल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली एक तासाच्या आत करावी लागते. चाचणीचे निदान केवळ १५ वा जास्तीत जास्त ३० मिनिटांत होते. ही चाचणी कोणत्याही बाह्य उपकरणाशिवाय नुसत्या डोळ्याने करता येते. यामध्ये निगेटिव्ह निदान ९९.३ ते १०० टक्के, तर पॉझिटिव्हचे प्रमाण ५०.६ ते ८४ टक्के आहे. या चाचणीसाठी केवळ ४५० रुपये खर्च येतो, शिवाय वेळही वाचतो. एक किट एकदाच उपयोगात येते.कंटेन्मेंट झोन, हॉटस्पॉट, शासकीय रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्न रुग्णालयामध्ये तातडीच्या उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टचा उपयोग करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती. या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाने ४० हजार किट खरेदीला मान्यता दिली आहे. यासाठी आपत्ती निवारण निधीतून ४.५० कोटी रुपये मंजूर केले आहे. नागपूर विभागात या किट उपलब्ध झाल्या आहेत.अशा व्यक्तींची करता येणार टेस्टकंटेन्मेंट झोन, हॉटस्पॉटमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करता येते. फ्ल्यू सदृश तसेच अतिजोखमीच्या व्यक्तीच्या संपर्कातील लक्षणे नसलेल्या, इतरमध्ये हृदय विकार, फुप्फुस, यकृत, मूत्रपिंड, मधुमेह, रक्तदाब इत्यादी विकार, त्याचप्रमाणे केमोथेरेपी, एचआयव्ही पॉझिटिव्ह, अवयव प्रत्यारोपण केलेले वा वृद्ध व्यक्ती, गरोदर महिलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयामध्ये आंतररुग्ण भरतीसाठी तातडीची चाचणी म्हणून ‘रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट’चा उपयोग केला जाणार आहे.चंद्रपूर जिल्ह्याला १ हजार रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट किट प्राप्त झाल्या आहे. या चाचणीसाठी विशिष्ट पथक तयार करून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यानंतर लवकरच प्रत्यक्ष चाचणीला सुरूवात केली जाईल. या चाचणीसाठी तालुकास्तरावर केंद्र उभारले जाणार आहे. तसेच आवश्यक तेथे मोबाईल व्हॅनद्वारेही चाचणीची सुविधा दिली जाणार आहे. कमी वेळात अधिक चाचण्या यामुळे शक्य आहे.- डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्र