शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ...अन्यथा, राज्यात पुन्हा लॉकडाऊन! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 06:53 IST

लसीकरण मोहिमेची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे शुक्रवारी मोलगी व धडगाव येथे आले होते. सुरुवातीला त्यांनी मोलगी ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाची पाहणी केली. तेथील नागरिकांशी संवाद साधला.

नंदुरबार : राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याने अजूनही लोकांनी काळजी घ्यावी, नियम पाळावेत ही कळकळीची विनंती आहे. अन्यथा, पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दिला.लसीकरण मोहिमेची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे शुक्रवारी मोलगी व धडगाव येथे आले होते. सुरुवातीला त्यांनी मोलगी ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाची पाहणी केली. तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर धडगाव येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून तेथेच अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या वेळी आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी, कृषिमंत्री दादा भुसे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आदी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले,  शहरी भागात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध असतात. मात्र ग्रामीण, दुर्गम-अतिदुर्गम भागातही चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे.

नवा स्ट्रेन नाही - - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत सध्या वाढली असून ही चिंता वाढविणारी बाब आहे. - गेल्यावर्षी आपल्या हातात उपाययोजनेसाठी काही नव्हते. पण आता मात्र लस ही ढाल म्हणून मिळाली असून दुर्गम, अतिदुर्गम भागातील शेवटच्या माणसापर्यंत लसीकरणाची सुविधा प्रशासनाने पोहोचवावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. - राज्यात नाशिकसह कुठेही कोरोनाचा नवा स्ट्रेन नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मी लस घेतलीय, तुम्हीही घ्यामुख्यमंत्री ठाकरे यांनी लसीकरण घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधून, ‘मी लस घेतली आहे, पूर्णपणे सुरक्षित आहे, घाबरू नका, लस घ्या...’ असे आवाहन केले. तसेच ज्यांनी लस घेतली अशा नागरिकांशीही संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेतले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे