शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी : रुग्णालयात बेड नसल्याने खुर्चीवर बसून ऑक्सिजन घेण्याची रुग्णांवर वेळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 11:53 IST

रुग्णांची संख्या वाढल्यां रुग्णालयावरील ताणही वाढला. ऑक्सिजन बेड मिळणं झालं कठीण

ठळक मुद्देरुग्णांची संख्या वाढल्यां रुग्णालयावरील ताणही वाढला.ऑक्सिजन बेड मिळणं झालं कठीण

तेजस टवलारकर पिंपरी : शहरातील कोरोना रुग्णाची संख्या वाढल्याने वायसीएम रुग्णालयावरचा ताण वाढला आहे. ज्या रुग्णांना गंभीर लक्षणे आहेत. ज्याची ऑक्सिजन पातळी ही ९० पेक्षा कमी आहे. अशा रुग्णांना येथे दाखल केले जात आहे. परंतु रुग्ण वाढल्याने येथे ऑक्सिजन बेड मिळणे कठीण झाले आहे. अनेक रुग्णांना  ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. तसेच रुग्णांच्या रंगा लागत असल्याची स्थिती आहे.तर काही रुग्ण खुर्चीवर बसून ऑक्सिजन घेत असल्याची स्थिती आहे.सद्यस्थितीत वायसीएम रुग्णालयातील पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर कोरोनाचे रुग्ण आहेत. तिसरा मजल्यावरील दोन वार्ड मध्येही कोरोनाचे रुग आहेत, तर  दोन वॉर्ड हे कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी रखीव आहेत. पहिल्या मजल्यावरील एक आयसीयू कोरोना रुग्णांसाठी तर एक आयसीयू इतर रुग्णांसाठी ठेवण्यात आले आहे. फक्त चौथा मजला हा इतर रुग्णांसाठी राखीव ठेण्यात आला आहे. त्याच बरोबरच रुग्णालयात असलेल्या रुबी अल केअरचे आयसीयू येत्या एक ते दोन दिवसात ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णालय कोविड रुग्णालय झाल्याची स्थिती आहे.रुग्णालयांमध्ये कोरोना आणि इतर आजारांच्या रुग्णाची ये-जा असते. त्यामुळे नेमका कोणता रुग्ण कोरोनाचा आहे, हे लक्षात येत नाही. यामुळे येथील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक रुग्ण कोरोनाचे असल्याने त्याचा परिणाम हा बाह्य रुग्णालयातील ओपीडीवर झाला आहे. रोज होणार ओपीडी कमी झाली आहे. रुग्ण संख्या कमी असताना रोज साधारण १५०० रुग्णांची ओपीडी होत होती. सद्यस्थितीत रोज ५०० रुग्णांची ओपीडी होत आहे.

चतुर्थ श्रेणी  कर्मचाऱ्यांची कमतरता कोरोना रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी सध्या फक्त सात कर्मचारी आहेत. प्रत्यक्षात या ठिकाणी १५ ते २० कर्मचाऱ्यांची गरज आहे. रुग्णाला दाखल करताना या कर्मचाऱ्यांना रुग्णा सोबत जावे लागते. ज्या वॉर्ड मध्ये रुग्णाला दाखल केले तिथे ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जावे लागते. तसेच रुग्णालयात जागा नसल्यास इतर ठिकाणी रुग्णाला पाठविले तर तिथेही या कर्मचाऱ्यांना जावे लागते. रुग्णाला दाखल करून घेण्याची पूर्ण प्रक्रिया यांना करावी लागते. त्यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचारी वाढविण्यात येणे गरजेचे झाले आहे. रुग्णालयात एकूण ५०० परिचारिका आणि वार्ड बॉयची गरज आहे. प्रत्यक्षात ३४५ कर्मचारी उपलब्ध आहेत. तर मदतनीस आणि इतर कामासाठी ३१५ कर्मचाऱ्यांची गरज असून सध्या २५५ कर्मचारी आहेत. रुग्णांकडून वायसीएमला दाखल होण्याचा आग्रह सुरुवातीपासून वायसीएमचा मृत्यू दर हा कमी आहे. सुविधा उपलब्ध आहेत. महापालिकेच्या इतर रुग्णांलय आणि जम्बोच्या तुलनेत रुग्ण वायसीएम मध्ये दाखल होण्यासाठी रुग्ण आग्रह धरत असल्याची स्थिती आहे. रुग्णालयात सध्या फक्त अत्यावश्यक आणि गंभीर रुग्णांच्या शस्त्रक्रिया सुरू आहे. इतर शस्त्रक्रिया बंद आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटल