शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

CoronaVirus रुग्णांची संख्या वाढतेय; ... तर लॉकडाउनचा कालावधी वाढवावा लागेल - टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 06:11 IST

राज्यात ३८ हजार ३९८ जण होम क्वारंटाइन

- अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कोरोनाच्या शक्यतेमुळे होम क्वारंटाइन करण्यात आलेल्यांची संख्या आता ३८,३९८ वर गेली आहे, तर विविध दवाखान्यांमध्ये देखील ३०७२ लोक क्वारंटाइन केले गेले आहेत, असे सांगून आरोग्य मंत्री राजेश टोपे लोकमतशी बोलताना म्हणाले, बाधित किंवा संशयीय दोन्ही रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. वारंवार सांगूनही लोक ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीत, विनाकारण फिरण्यात त्यांना कसला मोठेपणा वाटतो माहिती नाही, पण असेच चालू राहिले तर नाईलाजाने काही शहरांमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागेल.

त्यांच्याशी झालेली ही बातचित :दिल्लीच्या मर्काझमधून राज्यात रुग्णांची संख्या वाढली, असे सांगितले जाते. ते खरे काय आहे?आपल्याला केंद्र सरकारकडून १,२२५ जणांची यादी आली. त्यापैकी १,०३३ लोकांना आपण शोधून काढले, त्यांच्या तपासण्या केल्या. त्यापैकी ७३८ लोकांना आपण क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. त्यापैकी ५ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत.राज्यात मास्क आणि पीपीई किटची सतत मागणी होत आहे. डॉक्टर्स, नर्सेस यांना मास्क मिळत नाहीत, असे सांगितले जात आहे. त्यावर सरकार काय करत आहे?आपल्याकडे सध्या २१ लाख ७० हजार तीन पदरी मास्क आहेत. ते राज्यभर पाठवण्यातही आले आहेत. ज्या ठिकाणी थेट कोरोनाचे बाधित रुग्ण ठेवले आहेत तेथेच एन ९५ मास्कची गरज पडते. एकट्या आरोग्य विभागाकडे एन-९५ मास्क आणि २५,६०० पीपीई किट देखील आहेत. आणखी आॅर्डर दिलेल्या आहेत. त्याची फार गरज पडत नसल्याने या गोष्टी कोणी फार तयार करत नव्हते, पण आता आपण त्याच्या उत्पादनाची सोय राज्यातच केली आहे.

व्हेंटिलेटर आपल्याकडे पुरेशे नाहीत असे बोलले जात आहे. त्याविषयी काय सांगाल?हा विषय नीट समजून घेण्याचा आहे. आपण ११,५९२ आयसोलेशन बेड फक्त कोरोना रुग्णांसाठी तयार ठेवले आहेत. त्यापैकी फक्त ५३७ बेड वापरात आहेत. आयसीयूचे २,४१५ बेड राज्यात आहेत. त्यापैकी फक्त चार ते पाच बेड वापरात आहेत. आपल्याकडे एकट्या आरोग्य विभागाचे २,८०० व्हेंटिलेटर आहेत. एकही रुग्ण आज व्हेंटिलेटरवर नाही. शिवाय महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत राज्यात जवळपास १,००० हॉस्पिटलची नोंदणी झालेली आहे, त्यांच्याकडे सुमारे २००० व्हेंटिलेटर्स आहेत, ज्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे वस्तूस्थिती समजून न घेता भीती निर्माण करण्याचे काम कोणी करू नये.

मुंबई व पुण्यात रुग्ण कमी होताना दिसत नाही, त्याचे काय?मुंबईत शुक्रवारी ६७ रुग्ण आढळले, आज ती संख्या ५० पर्यंत आहे. म्हणजे कमी आहे. आपण ज्या भागात ३ पेक्षा जास्त कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत, ते भाग सील केले आहेत. असे २१० विभाग एकट्या मुंबईत आहेत. त्यावर कठोर नजर ठेवली जात आहे. संख्या वाढू द्यायची नसेल तर जनतेने ही सहकार्य केले पाहिजे, ते मिळणार नसेल तर लॉक डाऊन वाढवणे व तो आणखी कठोर करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.समूह तपासणीची वाढ करण्याची गरज आहे पण काही भागात डॉक्टरांना जाऊ दिले जात नाही, अशा तक्रारींवर काय करणार?आपण २,४५५ पथके क्लस्टर कन्टेन्मेंटसाठी तयार केली आहेत. आत्तापर्यंत ९.२५ लाख लोकांची तपासणी पूर्ण झाली आहे. मात्र जर लोक सहकार्य करणार नसतील तर महामारीच्या कायद्यानुसार नाईलाजाने लोकांवर कठोर कारवाई करावी लागेल.

आजीबाईचा बटवा आठवा - टोपेमी आरोग्य मंत्री म्हणून जबाबदारीने काही गोष्टी सांगतो. त्यात आपण रोज कोमट पाणी प्या, प्राणायाम, योगा व श्वासाशी संबंधित आसने करा. हळद, जिरे, लसूण, धने यांचा वापर खाण्यात वाढवा. हर्बल टी ज्यात तुळशी, दालचिनी व आले आहे, ती वापरा. व्हिटामिन सी साठी आवळा, लिंबू, संत्रे रोज खा. आपल्या आजीकडून आपल्याला हे तिच्या बटव्यातून मिळालेले आहे तेच आता करायचे आहे असेही राजेश टोपे म्हणाले.भाजी बाजार : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागपुरात मनपा प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी मैदानात भाजीबाजाराची व्यवस्था केली. परंतु, ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे उल्लंघन करीत बाजारामध्ये प्रचंड गर्दी होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपे