शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

coronavirus: राज्यात आज नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले, दिवसभरात  ८४९३ नवीन रुग्ण सापडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 21:04 IST

राज्यात आज कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८४९३ नविन रुग्णांचे निदान झाले.

मुंबई -  कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे त्रस्त असलेल्या महाराष्ट्राला आज मोठा दिलासा मिळाला आहे. आज राज्यात कमी रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक राहिले. आज दिवसभरात राज्यात तब्बल ११ हजार ३९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आज दिवसभरात राज्यामध्ये ८ हजार ४९३ नवे रुग्ण सापडले आहे. 

राज्यात आज कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८४९३ नविन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख २८ हजार ५१४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ५५ हजार २६८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. कालच्यापेक्षा आज राज्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३२ लाख ०६ हजार २४८ नमुन्यांपैकी ६ लाख ०४ हजार ३५८ नमुने पॉझिटिव्ह (१८.८ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ५३ हजार ६५९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ५५६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २२८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३५ टक्के एवढा आहे.आज निदान झालेले ८४९३ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २२८ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-७५३ (४०), ठाणे- १३७ (३), ठाणे मनपा-२१२, नवी मुंबई मनपा-२५० (८), कल्याण डोंबिवली मनपा-२४९ (२), उल्हासनगर मनपा-१६ (६), भिवंडी निजामपूर मनपा-४ (२), मीरा भाईंदर मनपा-८४ (१), पालघर-१०५, वसई-विरार मनपा-६९ (२), रायगड-११५ (१०), पनवेल मनपा-११०, नाशिक-२१९ (२), नाशिक मनपा-५३५ (५), मालेगाव मनपा-५६ (१), अहमदनगर-२३५ (२),अहमदनगर मनपा-८५ (१), धुळे-४३ (२), धुळे मनपा-३८ (१), जळगाव-२९६ (९), जळगाव मनपा-६६ (२), नंदूरबार-२, पुणे- ३४१ (९), पुणे मनपा-९१९ (२६), पिंपरी चिंचवड मनपा-६१५ (१९), सोलापूर-१९९ (६), सोलापूर मनपा-५४ (१), सातारा-२०५ (११), कोल्हापूर-२१३ (५), कोल्हापूर मनपा-१२६ (२), सांगली-१२६ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-१९० (४), सिंधुदूर्ग-६१, रत्नागिरी-५५, औरंगाबाद-११९ (१),औरंगाबाद मनपा-११६ (३), जालना-२०६ (१), हिंगोली-०, परभणी-२२, परभणी मनपा-३१ (१), लातूर-७४ (१२), लातूर मनपा-५८ (४), उस्मानाबाद-१५२ (६), बीड-८० (२), नांदेड-६६ (२), नांदेड मनपा-४३ (२), अकोला-४, अकोला मनपा-१३, अमरावती-१४, अमरावती मनपा-७५, यवतमाळ-३० (२), बुलढाणा-४५ (२), वाशिम-६१, नागपूर-८० (१), नागपूर मनपा-३५१ (४), वर्धा-५, भंडारा-१९, गोंदिया-१५, चंद्रपूर-९, चंद्रपूर मनपा-७, गडचिरोली-१३, इतर राज्य २.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याMumbaiमुंबई