शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

CoronaVirus राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ६५ हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 05:42 IST

दिवसभरात ९९ जणांचा मृत्यू। नवीन २९४० बाधितांची नोंद, आतापर्यंत २८,०८१ जण कोरोनामुक्त

मुंबई : राज्यात शनिवारी २९४० नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ६५ हजार १६८ इतकी झाली आहे. यापैकी बरे झालेले आणि मृतांचा आकडा वगळता राज्यातील ३४ हजार ८८१ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात ९९ जणांचा मृत्यू झाला असून १०८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण २८ हजार ८१ नागरिक कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.महाराष्ट्रातील रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११.३ दिवस होता तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्णवाढीचा वेग सध्या १७.१ दिवस आहे, तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.०७ टक्के आहे. मृत्यूदर ३.३७ टक्के इतका आहे. सध्या राज्यात ५ लाख ५१ हजार ६६० लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ३५,४२० लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.राज्यातील आजच्या ९९ मृतांपैकी सर्वाधिक ५४ मुंबईतील आहेत. याशिवाय, वसई-विरार ७, पनवेल ७, ठाणे ६, रायगड ३, नवी मुंबई २, कल्याण-डोंबिवली २ असे ठाणे आरोग्य मंडळात ८१ मृत्यू आहेत, तर नाशिक मंडळात जळगाव येथील तीन मृतांची नोंद आहे. पुणे मंडळात १२ जणांचा मृत्यू झाला असून यात पुणे मनपा क्षेत्रातील ६ आणि सोलापुरातील ६ जणांचा समावेश आहे. नागपुरात एक तर राजस्थानातील एकाचा पनवेलमध्ये, तर बिहार येथील एकाचा मुंबईत मृत्यू झाला.आजच्या ९९ मृतांमध्ये ६२ पुरुष तर ३७ महिलांचा समावेश आहे. यातील ४८ जण ६० वर्षे किंवा त्यावरील होते, तर ४९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. दोन जण ४० वर्षांखालील आहेत. या ९९ रुग्णांपैकी ६६ जणांमध्ये (६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. राज्यात कोरोनाग्रस्त एकूण मृतांची संख्या २१९७ झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस