शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: राज्याच्या चिंतेत भर; डेल्टा प्लसचे तीन वेगवेगळे विषाणू सापडल्यानं धोका वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 08:03 IST

CoronaVirus News: राज्यात वाढतोय डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका; आतापर्यंत ६६ जणांना लागण

मुंबई: राज्यातील कोरोना संकट नियंत्रणात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दररोज ५ ते ६ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र तज्ज्ञांची चिंता कायम आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोना संक्रमणाचा धोका कायम आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट समूहाच्या तीन वेगवेगळ्या विषाणूंनी तज्ज्ञांच्या चिंतेत भर घातली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या नव्या रुपाचा धोका जाणून घेण्यासाठी अभ्यासाची गरज आहे. 

राज्यात डेल्टा व्हेरिएंटचे एकूण ६६ रुग्ण असल्याची माहिती विषाणूच्या जिनॉम सिक्वन्सिंगद्वारे समोर आली. यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे तीन विविध प्रकार आहेत. त्यांना Ay.1, Ay.2 आणि Ay.3 अशी नावं देण्यात आली आहेत. तज्ज्ञांनी डेल्टा प्लसच्या आणखी १३ उपवंशांचा शोध लावला आहे.  Ay.1, Ay.2, Ay.3 पासून त्यांची सुरुवात होते आणि हीच यादी १३ पर्यंत जाते. डेल्टा व्हेरिएंटचं म्युटेशन झाल्यानं डेल्टा प्लसची निर्मिती झाली. डेल्टाच्या स्पाईक प्रोटिनमध्ये K417N नावाच्या अतिरिक्त म्युटेशनमुळे डेल्टा प्लस व्हेरिएंट तयार झाला. 

मुंबईलादेखील डेल्टा प्लसचा धोकामुंबईत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ११ रुग्ण आढळून आले आहेत. पूर्व मुंबईत एका ६३ वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाला आहे. या महिलेच्या कुटुंबातील ६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील काही जणांना डेल्टाची लागण झाली आहे. गेल्या महिन्यात रायगड जिल्ह्यात एका ६९ वर्षीय महिलेचा डेल्टामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय रत्नागिरीत ८० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत ६६ रुग्णमहाराष्ट्रात आतापर्यंत डेल्टा प्लसचे ६६ रुग्ण आढळले आहेत. यातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. डेल्टाची लागण झालेल्या ६६ पैकी काहींनी कोरोना प्रतिबंधात्मत लसीचे दोन्ही डोस घेतले होते. राज्याच्या विविध भागांत रुग्णांचे नमुने घेऊन जिनॉम सिक्वन्सिंग करण्यात आलं. त्यातून ही माहिती समोर आली. डेल्टा प्लसचे सर्वाधिक १३ रुग्ण उत्तर महाराष्ट्रात आहेत. त्यानंतर रत्नागिरी (१२) आणि मुंबई (११) चा क्रमांक लागतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस