शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
4
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
5
"मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून मला..," फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
7
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
8
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
9
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
10
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
11
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
12
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
13
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
14
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
15
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
16
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
17
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
18
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
19
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
20
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई

CoronaVirus News : धक्कादायक! राजभवनमधील आता 24 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 14:22 IST

राजभवनमधील कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या आता 24 झाली आहे.

मुंबई - राजभवनमधील कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या आता 24 झाली आहे. आधी राजभवनमधील 2 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर 100 कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात आली. त्यातील 40 कर्मचाऱ्यांचे अहवाल शनिवारी सायंकाळी आले. त्यात 14 जण पॉझिटिव्ह आढळले होते. रविवारी दुपारी  आणखी एक अहवाल आला असून, त्यात अन्य 8 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे राजभवनमधील कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची संख्या आता 24 झाली आहे. 

आता सर्व कर्मचा-यांच्या कुटुंबीयांचीसुद्धा कोरोना चाचणी होईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेनं तातडीनं उपाययोजना राबवल्या आहेत. राजभवन येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "डी" विभाग कार्यालयाकडून कार्यवाही करण्यात आली आहे. मुंबईत वाळकेश्वर स्थित राजभवन येथे काही दिवसांपूर्वी कोरोना बाधित दोन रुग्ण आढळून आले होते. या कारणाने महानगरपालिकेने राजभवन वरील अधिकारी/कर्मचारी यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे सुचवले होते. राजभवन येथील कर्मचारी निवासस्थानी अलगीकरण (quarantine) सोयीस्कर असल्यास त्यांना तेथेच त्यांच्या व्यवस्थेनुसार अलगीकरण करण्यात येणार आहे. राजभवन येथील प्रशासनाने जर महानगरपालिकेकडे अलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या, तर तेथील कर्मचाऱ्यांचे अलगीकरण महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या केंद्रांमध्ये त्वरित केले जाणार आहे. महापालिकेच्या डी विभाग कार्यालयाकडून राजभवन येथे निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही वेळोवेळी केली आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचारी तेथे नेमण्यात आले आहेत.  राजभवन येथे डॉक्टर्स व तत्सम कर्मचारी आहेत. तथापि आवश्यक वाटल्यास महापालिकेचे डॉक्टर्स व इतर कर्मचारी ही मदतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

प्रकृतीसंदर्भात काही बातम्या निराधार: राज्यपाल कोश्यारी

आपल्या प्रकृतीसंदर्भात प्रसार माध्यमांत काही ठिकाणी प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार असल्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे. ‘आपली प्रकृती ठणठणीत असून, आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून, त्यांचे परिणामदेखील नकारात्मक आले आहेत. कोरोनाची लक्षणेदेखील आपल्यात दिसून आली नाहीत. मात्र, इतरत्र असलेली परिस्थिती पाहून आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मास्कचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहोत. आपल्या प्रकृतीसंदर्भात काही ठिकाणी येत असलेले वृत्त निराधार आहे. आपली तब्येत चांगली आहे, असे राज्यपालांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा

CoronaVirus News : राजभवनाचे १६ कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानं महापालिका खडबडून जागी, तातडीनं राबवल्या उपाययोजना

CoronaVirus News : 3 रुग्णालयांनी नाकारलं; आईच्या आत्महत्येच्या धमकीनंतर मुलाला चौथ्या रुग्णालयानं स्वीकारलं, पण...

...म्हणून येत्या २ महिन्यांत सोन्याचे भाव आणखी भडकणार; ही असू शकतात 'कारणं'

CoronaVirus News : पुनश्च 'होम'! 'या' प्रश्नांची उत्तरे मिळणार का? 

भारताकडून पहिल्यांदाच मालाबार युद्धाभ्यासाचं ऑस्ट्रेलियाला आमंत्रण; चीन भडकला

धक्कादायक! अंत्यसंस्कारासाठी चक्क रिक्षातून आणला कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृतदेह

...म्हणून अशानं दोन देशांमधले सगळेच प्रश्न सुटत नसतात, शरद पवारांचा मोदींना सल्लावजा टोला

CRPFनं काढली बंपर भरती; बेरोजगारांना नोकरीची संधी; 1.42 लाखांपर्यंत मिळणार पगार 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस