शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : ऑनलाइन शिक्षणाचा ‘तो’ आदेश फक्त राज्य मंडळाच्या शाळांसाठी

By अतुल कुलकर्णी | Updated: June 25, 2020 06:51 IST

ऑनलाइन शिक्षण देण्यावरून सध्या राज्य आणि केंद्रीय बोर्डांच्या शाळांचे व्यवस्थापन, पालकांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे.

अतुल कुलकर्णी मुंबई : पूर्व प्राथमिक, इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा वापर करू नये, हा आदेश फक्त राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांसाठी असल्याची माहिती एससीईआरटीचे संचालक दिनकर पाटील यांनी 'लोकमत'ला दिली. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयाने हेच सांगितले.ऑनलाइन शिक्षण देण्यावरून सध्या राज्य आणि केंद्रीय बोर्डांच्या शाळांचे व्यवस्थापन, पालकांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे. राज्य शासनाने १५ जून रोजी काढलेला आदेश राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना आहेत. या सूचना केंद्रीय बोर्डाच्या शाळांना लागू होत नाहीत. हा आदेश नेमका कोणासाठी आहे याबद्दल शिक्षण मंत्र्यांचे खाजगी सचिव सुनील चंदनशीवे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी, हा आदेश राज्य शासनाच्या शाळांसाठी आहे, केंद्रीय बोर्डाने या सूचना त्यांच्या शाळांना देखील द्याव्यात, अशी विनंती केंद्र सरकारला केल्याचे स्पष्ट केले. एससीईआरटीचे संचालक दिनकर पाटील यांनी हा निर्णय राज्य बोर्डांच्या शाळांसाठी आहे. त्यातील सगळ्याच सूचना राज्य शासनाच्या शाळांसाठी आहेत असे स्पष्ट केले आहे.मात्र, या आदेशात महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापनाने काढलेले आदेश यांचाही संदर्भ आहे. आपत्ती व्यवस्थापनाने कोरोनाच्या साथीमुळे वेळोवेळी काढलेले आदेश मात्र कोणत्याही बोर्डाची शाळा असली तरी त्यांना लागू राहतील.>मुलांना वेगळे उपक्रम शिकवावेतकोणत्याही बोर्डाच्या शाळा असल्या तरी संस्थाचालक, शिक्षकांनी या वयातील मुलांना वेगवेगळे उपक्रम शिकवावेत, सक्ती करू नये. यामुळे मुलांच्या या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. आपण आपल्या मुलांना या वयात आॅनलाईन शिक्षण सक्तीचे केले असते का? हा प्रश्न प्रत्येक संस्थाचालक, पालक व शिक्षकाने स्वत:ला विचारावा, असे माजी शिक्षण संचालक मोहन आवटे यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसonlineऑनलाइन