शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

CoronaVirus News: दिलासादायक! ऑक्सिजनवर फक्त १८ टक्के रुग्ण; ८२ टक्के खाटा रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 06:59 IST

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या महानगर क्षेत्रातील २६,९६१ ऑक्सिजन खाटांपैकी सुमारे १८ टक्के म्हणजेच ४,७०७ ऑक्सिजन खाटांवर रुग्ण आहेत.

मुंबई/ठाणे : कोरोना संसर्गाच्या आकड्यांमध्ये चढ-उतार होत असले तरी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या महानगर क्षेत्रातील २६,९६१ ऑक्सिजन खाटांपैकी सुमारे १८ टक्के म्हणजेच ४,७०७ ऑक्सिजन खाटांवर रुग्ण आहेत. ८२ टक्के खाटा रिक्त असून, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या काळात ही एक दिलासादायक बाब मानली जात आहे. ओमायक्रॉन लाटेत बाधित रुग्णांना छातीच्या वरील भागातच संसर्ग होत असल्याने ऑक्सिजनची जास्त गरज भासत नसल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेऊन सगळ्या स्थानिक प्रशासनांना ऑक्सिजन सज्जतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई या मोठ्या महापालिकांसह अंबरनाथ, बदलापूर या नगरपालिकांपर्यंत सगळ्यांनीच ऑक्सिजन साठ्याच्या क्षमतेत वाढ केली आहे. एकट्या मुंबईत ९०० मेट्रिक टनापर्यंत क्षमता वाढवण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेसारखी स्थिती नाही, तरीही...शहरातील ऑक्सिजनची उपलब्धता पुरेशी असून, दुसऱ्या लाटेसारखी स्थिती उद्भवलेली नाही. तरीही याकडे यंत्रणांचे लक्ष आहे. शिवाय, खासगी क्षेत्रातील ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्याकडे पालिका लक्ष ठेवून आहे. मागील आठवड्यात वाढलेली रुग्णसंख्या आता कमी होत असली तरीही पालिकेने केवळ थांबा आणि वाट पाहा, ही भूमिका घेतलेली नाही. संसर्गाच्या सद्यस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असून, सहवासितांच्या शोधावरही भर देण्यात येत आहे. - सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका 

ऑक्सिजन साठा तयारजिल्ह्यात १२२०.९५ मेट्रिक टन ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता आहे. सध्या आवश्यकतेनुसार ५६५.१९ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण केला जात आहे. उर्वरित ६५५.७६ मेट्रिक टन  तयार करण्यासाठी यंत्रणा सक्षम आहेत. सिलिंडरच्या १२७.७५ मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था केली आहे. त्यातील १००.८९ मेट्रिक टन सिलिंडरचा वापर सुरू आहे. जिल्ह्यात २२८.७५ मेट्रिक टन सिलिंडरच्या ऑक्सिजन निर्मितीची क्षमता तयार केली आहे.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे ऑक्सिजन खाटांची स्थितीशहर             ऑक्सिजन     ऑक्सिजनवरील    खाटा     रुग्ण      मुंबई                   १२२८२        ३५३०ठाणे                    २५२२               १५७ नवी मुंबई               ३४०४               ६७५कल्याण-डोंबिबली     १६६०        ८५ उल्हासनगर             ३५५                 ०२ भिवंडी                    ११४                 ०२ भाईंदर                   १३९९                १७६अंबरनाथ                 ५५                   १२ बदलापूर                 १२०              २३ वसई-विरार          २८१८                ०० रायगड               २२३२            ४५एकूण            २६९६१          ४७०७

मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, पालिका आणि खासगी क्षेत्रात एकूण १२ हजार २८२ ऑक्सिजन खाटा उपलब्ध आहेत. त्यातील ३ हजार ५३० खाटांवर रुग्ण उपचाराधीन आहेत. ठाणे शहरात २,५२२ ऑक्सिजन खाटा उपलब्ध असून, त्यापैकी १५७ खाटांवर रुग्ण आहेत. सरासरी दोन टन ऑक्सिजन वापरला जातो आहे, तर एकूण क्षमता १७ टनाची आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या