शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: वाढता वाढता वाढे धोका! महाराष्ट्रासमोर नवं संकट; 'त्या' आकड्यामुळे चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 11:22 IST

CoronaVirus News: राज्यासमोरील अडचणींमध्ये वाढ; मे महिन्यातील आकडा वाढवतोय चिंता

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक कमी होत आहे. एप्रिलच्या मध्यावर कोरोना रुग्णांचा आकडा ७० हजारांच्या पुढे गेला होता. आता तोच आकडा ३० हजारांच्या खाली आला आहे. गेल्या दीड महिन्यापासून राज्यात कठोर निर्बंध लागू असल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे मोठ्या शहरांमधील रुग्णसंख्या घटली आहे. मात्र आता एका नव्या संकटानं महाराष्ट्राची चिंता वाढली आहे.राज्यातील लॉकडाऊन १ आठवड्यानं वाढणार?; आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यतामे महिन्यात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. मात्र याच महिन्यात लहान मुलांना असलेला कोरोनाचा धोका वाढला. मे महिना संपायला अद्याप चार दिवस शिल्लक आहेत. मात्र आतापर्यंत ३४ हजार ४८६ लहानग्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आकडा सातत्यानं वाढत आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार, १ ते २६ मे या कालावधीत १० वर्षांपर्यंतच्या ३४ हजारांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली. कोरोनातून बरे झाल्यानंतर ‘पोस्ट कोविड लक्षणं’ बनू शकतात धोकादायक; तज्ज्ञांचा इशारा१ मे रोजी राज्यातील कोरोना बाधित मुलांची संख्या १ लाख ३८ हजार ५७६ होती. २६ मे रोजी हा आकडा १ लाख ७३ हजार ६० वर पोहोचला. १ मे रोजी ११ ते २० वर्षे वयोगटातील कोरोना बाधितांची संख्या ३ लाख ११ हजार ४५५ होती. २६ मे रोजी हाच आकडा ३ लाख ९८ हजार २६६ वर जाऊन पोहोचला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र या संदर्भात कोणतीही शास्त्रीय माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे पालकांनी चिंता करू नये, असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस