शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: भयंकर! कोरोना रुग्णांची  राज्यातील संख्या ५० हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 06:48 IST

आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २९ लाख ५३ हजार ५२३ झाली असून मृतांचा आकडा ५५ हजार ६५६ झाला आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतो आहे. शनिवारी काेराेनाच्या ४९ हजार ४४७ रुग्ण आणि २७७ मृत्यूंची नाेंद झाली. यापूर्वी, राज्यात शुक्रवारी ४७ हजार रुग्णांची नोंद झाली होती. परिणामी, राज्य शासनासमोर कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २९ लाख ५३ हजार ५२३ झाली असून मृतांचा आकडा ५५ हजार ६५६ झाला आहे.

सध्या राज्यात ४ लाख १ हजार १७२ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.४९ टक्के झाले असून मृत्युदर १.८८ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ३ लाख ४३ हजार १२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.५२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१ लाख ५७ हजार १३५ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १८ हजार ९९४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. शनिवारी नोंद झालेल्या २७७ मृत्यूंपैकी १३२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ६७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. 

मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या ६२ हजार १८७ वर पोहोचली आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८३ टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४४ दिवसांवर पोहोचला आहे. २७ मार्च ते २ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.५४ टक्के असल्याची नोंद आहे. शहर, उपनगरात सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या ७० असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ६८१ आहे. मागील २४ तासांत रुग्णांच्या सहवासातील ३४ हजार २४४ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेण्यात आला आहे.२४ तासांत मुंबईत ९,०९० मुंबईत दिवसागणिक कोरोनाचा विळखा वाढतो आहे, त्यामुळे यंत्रणांसमोरचे आव्हान वाढत आहे. शहर, उपनगरात २४ तासांत ९ हजार ९० रुग्ण आणि २७ मृत्यूंची नोंद झाली असून आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ४१ हजार २८२ झाली असून मृतांचा आकडा ११ हजार ७५१ झाला आहे.

मुंबईत ९ हजार ९० नव्या रुग्णांचे निदानउपचाराधीन रुग्णांची आकडेवारीपुणे         ७३,५९९मुंबई         ६०,८४६नागपूर         ५२,४०८ठाणे         ४८,६६०नाशिक         ३१,५१२दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख चिंताजनक३ एप्रिल         ४९,४४७२ एप्रिल         ४८,८२७१ एप्रिल         ४३,१८३३१ मार्च         ३९,५५४३० मार्च         २७,९१८

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस