शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

CoronaVirus News: इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोनावाढीचा वेग होतोय कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 07:28 IST

महाराष्ट्राने वेळोवेळी आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले असून कुठेही अगदी सुरुवातीपासून रुग्णसंख्या आणि मृत्यू लपविलेले नाहीत.

मुंबई : कोविडचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राने अतिशय गांभीर्याने आणि  पारदर्शकपणे पावले उचलल्याने दर १० लाख लोकांचा विचार केला, तर कोविडचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनावाढीचा वेग किंवा मृत्युदर कमी आहेत, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली. महाराष्ट्राने वेळोवेळी आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले असून कुठेही अगदी सुरुवातीपासून रुग्णसंख्या आणि मृत्यू लपविलेले नाहीत. २ फेब्रुवारी २०२१ च्या आकडेवारीनुसार दर दशलक्ष लोकसंख्येत दिल्लीत ३७ हजार ८४४, गोव्यात ३६ हजार ७३२, पाँडिचेरीत ३१ हजार ३५०, केरळमध्ये २८ हजार ८९, चंडीगढमध्ये १९ हजार ८७७ इतके पॉझिटिव्ह रुग्ण होते. त्यामानाने महाराष्ट्रात यादिवशी १६ हजार आठ रुग्ण होते. महाराष्ट्राचा  क्रमांक यामध्ये देशात सहावा होता.  सक्रिय रुग्णांबाबत महाराष्ट्रात दर १० लक्ष लोकसंख्येत २९० रुग्ण असताना केरळमध्ये २००० पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आज आहेत. एकूण मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात जास्त असली, तरी दर १० लाख लोकसंख्येत मृत्यूचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. २ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या आकडेवारीनुसार  दिल्लीत ६४७, गोव्यामध्ये ५२७, पाँडिचेरीत ५२२ आणि महाराष्ट्रात ४०३ मृत्यू झाले. त्यामुळे महाराष्ट्र हे दर १० लक्ष लोकसंख्येचा विचार केला, तर सर्वाधिक मृत्यू असलेले राज्य म्हणता येणार नाही. राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट राज्यात १,६२२ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर आतापर्यंत एकूण १९,५५,५४८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६७% एवढे झाले आहे. राज्यात दिवसागणिक उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसतेय; सध्या ३५ हजार ९४८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रविवारी २,६७३  नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ५७२ दिवसांवर मुंबईत रविवारी ७११ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ९४ हजार १२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहर उपनगरात बरे होण्याचा दर ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या