शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

CoronaVirus News : विमा कंपन्यांनाही कोरोनाचा फटका, आर्थिक घडी बिघडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 02:21 IST

मे, २०१९ आणि २०२० या दोन महिन्यांची तुलना केल्यास हा विमा काढणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ३८ टक्क्यांनी घटले आहे.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात असून कोट्यवधी भारतीय जीव मुठीत धरूनच जगत आहेत. त्यामुळे आरोग्य विमा काढणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असली तरी आयुर्विमा काढण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट होताना दिसत आहे. मे, २०१९ आणि २०२० या दोन महिन्यांची तुलना केल्यास हा विमा काढणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ३८ टक्क्यांनी घटले आहे.गेल्या वर्षी १६,२५,२१४ पॉलिसी काढण्यात आल्या होत्या. यंदा ते प्रमाण १०,०८,१७३ इतके कमी झाले आहे. विमा कंपन्यांच्या तिजोरीत ्रप्रीमियमच्या माध्यमातून १८ हजार ४१४ कोटी रुपये जमा झाले होते. गेल्या महिन्यातील ती रक्कम १३ हजार ७३९ कोटी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ या सरकारी आणि अन्य २३ खासगी कंपन्या विमा क्षेत्रात कार्यरत आहेत. इश्युरन्स रेग्युलेटरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीकडे (आयआरडीएआय) त्यांच्या व्यवसायाबाबतची माहिती संकलित केली जाते. तिथल्या नोंदींच्या आधारे ही माहिती हाती आली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात विमा संरक्षण असलेल्या विमाधारकांची संख्या १ कोटी ४३ लाख होती. तर, विम्याच्या माध्यमातून मिळणारी रक्कम (सम अ‍ॅश्युअर्ड) ३ लाख १० हजार ८६० कोटी होती. यंदा विमा धारकांची संख्या ५० लाख ७१ हजारांवर आली असून सम अ‍ॅश्युअर्डची रक्कम १ लाख ३७ हजार ५६५ कोटी इतकी कमी झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातल्या एप्रिल, मे महिन्याची तुलना यंदाच्या महिन्यांशी केली असता प्रीमियमची रक्कम २७.९२ टक्क्यांनी कमी झाली आहे. तर, पॉलिसीधारकांची संख्या (५१.३२), पॉलिसीचे संरक्षण असलेले (५७.६२) आणि सम अ‍ॅश्युअर्डच्या रकमेत (२०.२३) लक्षणीय घट झाली आहे.कोरोना संकटामुळे प्रत्येकाची आर्थिक घडी बिघडली आहे. आयुर्विमा काढण्यापेक्षा सध्या आरोग्य काढण्याची निकड प्रत्येकालाच वाटू लागली आहे. त्यामुळे आयुर्विमा काढण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. विमा क्षेत्रात २३ खासगी कंपनी सक्रिय असल्या तरी भारतीय आयुर्विमा महामंडळाचा वाटा त्यात आजही सर्वाधिक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस