शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: आषाढी वारीवर यंदाही प्रश्नचिन्हच; प्रतीकात्मक वारीची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 10:18 IST

मुख्यमंत्र्यांना महापूजेसाठी निमंत्रण

- बाळासाहेब बोचरेमुंबई : ‘आषाढी कार्तिकी विसरू नका मज’ अशी आळवणी करणाऱ्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आसुसलेल्या लाखो वारकऱ्यांना यंदाही आषाढी वारी होईल की नाही? आणि पांडुरंगाची भेट होईल की नाही? हीच चिंता सतावत आहे. सरकारने अद्याप वारीबाबत निर्णय घेतला नसला तरी गतवर्षी ज्याप्रमाणे प्रतीकात्मक सोहळा करण्यात आला तशीच तयारी प्रशासन व पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने सुरू केली आहे.नियम व अटी घालून यंदा तरी आषाढी पायी वारीला परवानगी द्यावी, अशा भावना दिंडीकरी, फडकरी व वारकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. काहींनी आंदोलनाचीही तयारी केली आहे. आळंदी व देहू संस्थानकडे अनेक दिंडीकरी वारीसाठी आग्रही आहेत. पण सर्व काही सरकारच्या निर्णयावर अवलंबून असल्याने सध्या तरी प्रशासकीय पातळीवर गतवर्षाप्रमाणेच तयारी सुरू आहे.दर्शन ऑनलाइनच येत्या २० जुलै रोजी आषाढी यात्रा असून तत्पूर्वी १२ जुलैला पांडुरंगाचा पलंग विधी झाल्यानंतर २४ तास दर्शन सुरू केले जाते. सध्या मंदिर बंद असल्याने ऑनलाइन दर्शन चालू असून रात्री तेही बंद केले जाते. १२ जुलैपासून २४ तास ऑनलाइन दर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे, असे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. मंदिर उघडण्याची शासनाने परवानगी दिली तर पलंग विधीपासून २४ तास थेट दर्शन सुरू केले जाईल असे ते म्हणाले.परंपरेप्रमाणे मानाचे नैवेद्य, पादुका भेटी, मानाचे दिंडीकरी, फडकरी अशा १९५ मंडळींना दर्शन देणे ही तयारी करण्यात आली आहे. तसेच पांडुरंगाच्या रथालादेखील आणि प्रदक्षिणेलाही परवानगी देण्यात आली आहे, असे औसेकर महाराजांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांना निमंत्रणआषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. मुख्यमंत्र्यांना या महापूजेसाठी निमंत्रण देण्याचा निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी